Healthy Lifestyle Secret : खाण्याच्या सवयी अन् सरकारी टॅक्स; जपानमधील लोकांचे फिटनेस सिक्रेट नक्की आहे तरी काय?

जपानी लोक नुडल्स, सुशी, सूप सतत खातात, तरीही त्यांची तब्बेत कशी सुटत नाही
Healthy Lifestyle Secret
Healthy Lifestyle Secretesakal

Healthy Lifestyle Secret :

तुम्हाला कोणी सांगितलं की जपानी लोक सर्वात जास्त फिट असतात. तर तुमचा विश्वास बसेल का? तुम्हाला खोटं वाटलं तरी हे खरं आहे. जगात सर्वात जास्त फिटनेस जपानी लोक राखतात. यात त्यांना त्यांच सरकारही करत मदत, ते कसे याबद्दल आज आपण माहिती घेऊयात.

सर्वात आधी तर तुम्हाला असं वाटलं असेल की, जपानी कार्टुन्समध्ये, सिरिअल अन् मुव्हीजमध्ये हे लोक सतत खातात असं दाखवलं जातं. बरं ते नुडल्स, सुशी, सूप सतत खातात. मग तरीही या लोकांची तब्बेत कशी सुटत नाही. त्यांच्या देशातील सुमो खेळाडू सोडले तर कोणीच जाड नाही हे कसं शक्य आहे? (Lifestyle)

Healthy Lifestyle Secret
Healthy Lifestyle : तुम्ही खरंच हेल्दी आहात? कसं ओळखाल?

८५ वर्ष सहज जगतात लोक

जपानी लोक म्हातारे झाले तरी ते स्व:त त्यांची कामे करतात. शेती, गार्डनिंग, स्वयंपाक, एखादा व्यवसाय असेल तर तोही प्रकृतीची कोणतीही कुरबुर न करता करतात. कारण, तिथले लोक फक्त बाहेरून नाही तर आतूनही तितकेच काटक असतात. म्हणूनच तर त्यांची वयोमर्यादा ८५ च्या ही पुढे आहे.

Healthy Lifestyle Secret
Lifestyle Tips : वय उतरंडीला लागलंय?; अशी घ्या स्वत:ची काळजी!

आता त्यांच्या या फिटनेसची काही कारणे जाणून घेऊयात.

जेवणाची पद्धत

जपानी लोक जास्त जेवतात असं वाटत तर तसं नाही. ते प्रत्येक गोष्ट खातात पण लिमिटमध्ये. त्यांच्या जेवणाची भांडी आकाराने छोटी असतात.त्यामुळे कितीही भांड भरून जेवण घेतलं तरी ते कमीच असतं. (Healthy Food)

दुसरी गोष्ट म्हणजे, जपानी लोक पोटभर जेवत नाहीत. ते पोट केवळ ८० टक्के भरतात. ज्यामुळे अगदी गच्च जेवलो अन् आता काम होईना अशी परिस्थिती त्यांच्यावर ओढावत नाही. पोट ८० टक्के भरलं की थांबायचं हेच त्यांना लहानपणापासून शिकवलं जातं. त्यामुळे ही त्यांची लाईफस्टाईल बनली आहे.

Healthy Lifestyle Secret
Lifestyle Tips : वय उतरंडीला लागलंय?; अशी घ्या स्वत:ची काळजी!

जेवणाची वेळ

जपानी लोक मासाहार कमी घेतात. त्यातही कोलेस्टेरॉल आणि फॅट वाढवणारे मांसाहारी पदार्थ कमी असतात. ते फळे, भाज्या जास्त खातात. तसेच, प्रॉपर तीन वेळा ते जेवतात. म्हणजेच सकाळी ८ वाजता नाश्ता, दुपारी ११ ते १ च्या वेळात जेवण आणि सायंकाळी ६ ते ८ या वेळात रात्रीचे जेवण घेतात.

चहा नाही ग्रीन टी

भारतात चहाप्रेमी अनेक आहेत. त्यामुळे सकाळी उठल्यावर अन् रात्री झोपेपर्यंत चहा पिणारे लोक आहेत. पण जपानी लोक चहा पितच नाहीत. ते ग्रीन टी पितात. दिवसभरात जेव्हा कधी थकल्यासारखे वाटेल तेव्हा ते ग्रीन टी पितात. कारण तोच त्यांची एनर्जी वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो. (Green Tea)

Healthy Lifestyle Secret
Lifestyle Tips : Stress Free Weekend एन्जॉय करण्यासाठी या टिप्स करा फॉलो, आठवडाही जाईल मजेत

पायी गाडीचा वापर

जपानी लोक श्रीमंत आहेत त्यांनी एक स्टेटस मेंटेन केला आहे. पण ते गाड्या अन् मोटारींचा कितपत वापर करतात हे विचार करण्यासारखे आहे. कारण, तुम्ही जापनीज कार्टूनमध्ये लोक, मुल सायकल किंवा चालत शाळेला कामाला जातात. ते सार्वजनिक वाहनांचा अधिक वापर करतात.

Healthy Lifestyle Secret
Healthy Lifestyle : त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यासाठी तुमची लाईफस्टाईल हवी हेल्दी..!

सरकार कशी मदत करतं?

सरकार दर महिन्याला नागरिकांचे फ्रि हेल्थ चेकअप करतं. आणि एक्सपर्ट वजन वाढले असेल तर त्याबाबतही गाईड करतात. तसेच, वातावरण बदलल की सरकारकडून कशी काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन केले जाते.

जपान सरकारने काही वर्षांपूर्वी एक कायदा आणला होता. त्यात पुरूष आणि महिलांच्या वजनासंदर्भात नियम केला होता. ज्याच पुरूषांसाठी पोटाच्या ढेरीची साईज ३३.५ तर महिलांसाठी ३५.५ होती. त्याहुन अधिक वजन वाढलं असेल तर त्यावर सरकार टॅक्स भरायला लावत होतं. ज्यामुळे लोक पैसे वाचवण्यासाठी बारीक होत होते. (Government Tax)

तर अशी साधी, सरळ लाईफस्टाइल फॉलो करून तुम्हीही फिट राहू शकता. केवळ बारीक होण्यासाठी नाही तर आजारांपासून दूर राहण्यासाठीही जपानी लोकांसारखं जगून बघुयात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com