How to Prevent Grains : अशाप्रकारे साठवा वर्षभरासाठी धान्य; किडे धान्याकडे फिरकले तर विचारा!

धान्यामध्ये ८ ते १० टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढतो
How to Prevent Grains
How to Prevent Grainsesakal

How to Prevent Grains : सामान्यपणे वर्षभरासाठी लागणारे धान्य जसे, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी इत्यादींची साठवणूक करून ठेवली जाते. कोणत्याही धान्याचा साठा करून ठेवताना योग्य काळजी घेणे आवश्यक असते. अनेक वेळा वातावरणातील बदलामुळे किंवा साठवणुकीत योग्य काळजी न घेतल्यामुळे कीड किंवा बुरशी लागून धान्य खराब होते.

धान्यामध्ये ८ ते १० टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढतो. कीड आणि बुरशी लागलेले धान्य खाण्यायोग्य राहत नाही. तसेच दाण्यांचे वजन कमी झाल्यामुळे योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यासाठी धान्य साठविताना योग्य ती काळजी घेऊन वेळीच उपाययोजना केल्यास संभाव्य नुकसान टाळता येते.

How to Prevent Grains
Dhule News : शालेय पोषण आहार धान्याची भरारी पथकांमार्फत होणार तपासणी

कडिलिंब

गहू असो डाळी असो कुठल्याही प्रकारचा तांदूळ असो, रवा असतो कडकडीत उन्हामध्ये त्याला छान ऊन दाखवून घ्यायचं. आता हे स्टोअर कसं करायचं.तर, कडिलिंबाचा पाला हा पण उन्हामध्ये छान सुकवून घ्या. आता तुम्ही ज्या डब्यात, किंवा कटेंनरमध्ये धान्य साठवणार आहात ते घ्या. त्यात सर्वात खाली कडिलिंबाचा पाला घाला. त्यावर गहू भरा. जेव्हा कंटेनर अर्धा भरून होईल. तेव्हा त्या धान्यावर कडिलिंबाची लेअर पसरवा. आणि मग त्यात राहीलेले धान्य ओता.

लक्षात ठेवा की, जेव्हा तुम्ही कंटेनरचं झाकण लावता तेव्हा त्यात ऑक्सिजन राहीला नाही पाहिजे. आता तो कसा ओळखायचा तर त्यासाठी एक छोटी मेनबत्ती किंवा दिवा घेऊन तो कंटेनरमध्ये ठेवा. आणि झाकण लावा.

आत असलेला दिवा त्या डब्यातील सगळी आद्रता शोषून घेतो. त्यामुळे किड्यांची निर्मिती होण्यासाठी त्यात पुरेसे वातावरण राहत नाही. जेव्हा तुम्हाला धान्य घेण्याची गरज असेल तेव्हा तो दिवा काढा आणि पुन्हा ही सेम प्रोसेस करा.

आता पुढची प्रोसेस म्हणजे त्या डब्यावर एक सुती कापड झाकायचं आणि ते रबर किंवा सुतळीने घट्ट बांधायचं. असं केल्याने धान्याच्या डब्यात ओलसरपणा राहत नाही आणि धान्यही सुरक्षित राहतं.

How to Prevent Grains
Ginger Storage : आल्याची साठवणूक कशी कराल ?

काय काळजी घ्याल

धान्याचे कंटेनर, हौद किंवा डबा काहीही असो त्यात दिवा ठेवताना तो तुम्हाला दिसेल. असाच ठेवावा. तसेच मोठी मेनबत्ती, उभी असलेली धान्यात पेरून उभी करू नका. त्यामुळे धान्याला आगही लागू शकते. त्यामुळे ही टिप वापरताना योग्य ती काळजी घ्या.

एरंडेल तेल

गहू किंवा इतर कोणतेही धान्य साठवताना एरंडेल तेल तुम्हाला मदत करेल. गहू, डाळ अशा पदार्थांना एक किलो धान्यासाठी एक छोटा चमचा एरंडेल तेल लावावे. केवळ वरून पसरून नाही तर ते हाताने चोळून धान्याला लावले पाहिजे. असे ही तुम्ही धान्याची काळजी घेऊ शकता.

तांदूळ

तांदूळ पण गावाप्रमाणेच एक ते दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचा. आता तुम्ही कडुलिंबाचे तुम्ही लेयर्स लावू शकता किंवा यामध्येच कडुलिंबाचे पान मिक्स केली असेल तरी चालेल. आता यात एक मोठा चमचाभर हे असं खडे मीठ घालायचं. यामुळे काही सोनकिडे वगैरे असतील तर त्याची वाढ थांबते आणि आणखी काही यामध्ये ग्रोथ होत नाही.

डाळ 

कोणतीही डाळ साठवण्यासाठी कडिलिंब वापरा. किंवा दोन ते तीन तमालपत्र घालू शकता. हीच ट्रिक तुम्ही रव्यासाठी वापरू शकता. रवा साठवायचा असेल तर तो दोन दिवस कडक उन्हात वाळवा. आणि त्यात तीन-चार तमालपत्री घाला. .

How to Prevent Grains
Summer Onion Storage : रखरखीत उन्हात कांद्याची साठवणूक; सिन्नरच्या पूर्व, पश्‍चिम भागातील चित्र

शेंगदाणे

शेंगदाणे आणले ना की यामध्ये जर काही असे खराब खवट शेंगदाणे झाले असतील तर हे साफ करून घ्यायचे. कारण एक जरी त्यामध्ये खवट शेंगदाणा राहिला तर ते बाकीचे हे खराब होतात. याची साठवणूक करताना त्यामध्ये दालचिनीचे तुकडे घालावेत.

साखर 

साखर आपण एक एक किलोने आणत नाही. तर ती आपण महिनाभर पुरेल अशी आणतो. गावाकडे तर कारखान्यावरील वर्षभराची साखर एकदम आणली जाते. त्यामुळे साखरेला मुंग्या, किडे लागू नयेत असे वाटत असेल तर साखरेत दालचिनी, लवंग घालून ठेवा. यामुळे साखरेला मुंग्या येत नाहीत.

खोबरं

सुख खोबरं खूपच टिकण्यासाठी सेम प्रोसेस करायचे त्यामधला मॉइश्चर काढायचं खोबरं आणले की वाट्या उन्हामध्ये ठेवायच्या आता या स्वच्छ आहेत तर खूप त्याला काळे डाग वगैरे असतील तर ते पुसून घ्यायचे सुती कापडाने कोरड करायचं. आणि त्यावर खोबरेल तेल लावावे. पुर्ण खोबऱ्याला तेल लावावं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com