Marriage Traditions : कुठे उष्टे अन्न तर कुठे वधुवरांवर फेकले जातात बाण; आगळ्या वेगळ्या लग्नाची गोष्ट!

प्रत्येक देशात लग्नाच्या वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा असतात
Marriage Traditions
Marriage Traditionsesakal

Marriage Traditions : लग्न हे दोन व्यक्तींसोबत कुटुंबांना जोडणारे बंधन आहे. हिंदू पद्धतीच्या विवाहातही कितीतरी वेगवेगळ्या प्रथा आहेत. काही लग्नात वधु-वराच्या तोंडात लवंग दिली जाते, तर कुठे लग्नाआधीच वधूचा गृहप्रवेशही केला जातो अन् मग अक्षता पडतात. हळद मेहंदी या प्रसिद्ध प्रथा सोडून इतरही बारीक सारीक अनेक प्रथा आहेत.

भारतात आहेत तशाच प्रथा परदेशातही आहेत. अमेरिका आणि ब्रिटन सारख्या काही देशांच्या विधींबद्दल चित्रपटांमध्ये देखील ऐकले किंवा पाहिले आहे. प्रत्येक देशात लग्नाच्या वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा असतात. पण अशा अनेक परंपरा आहेत, ज्या जाणून घेतल्यावर तुम्हाला वाटेल की लग्नातही असे विचित्र विधी होतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही परंपरांबद्दल सांगणार आहोत.

Marriage Traditions
Sologamy Marriage : 'ड्रीम वेडिंग' साठी 20 वर्षे साठवले पैसे, अन् शेवटी स्वतःशीच केलं लग्न

दक्षिण अफ्रिका काँगो

काँगोमध्ये लग्नाच्या दिवशी वधू-वरांना हसण्याची परवानगी नाही. तिथे वधू-वरांनी एकमेकांकडे पाहून हसणे चुकीचे मानले. तिथल्या लोकांच्या मते, जोडपी खूश आहेत म्हणजे ते लग्नाबाबत गंभीर नाहीत. त्यामुळे जगभरातील लोक लग्नात हसत हसत फोटो काढतात, तर काँगोमध्ये वधू-वर हसायला घाबरतात.

जर्मनी

लग्नानंतर, लग्नातील पाहुणे नवविवाहित जोडप्याच्या घरातील वाईट गोष्टी दूर करण्यासाठी घरातील विविध काचेची, धातूंची भांडी जमिनीवर फेकून फोडतात. अन् लग्नानंतर लगेचच वधू आणि वर तो सगळा पसारा साफ करतात. यामुळे पती-पत्नीतील सामंजस्यपणा वाढतो, असे या लोकांचे म्हणणे आहे.

Marriage Traditions
Same Sex Marriage Explainer : 'समलैंगिक विवाहा'ला मान्यता कशी देणार, पाच न्यायधीशांच्या खंडपीठाचे म्हणणे काय?

स्कॉटलंड

स्कॉटलंडमध्ये लग्नातील पाहुणे जोडप्यावर लग्नातील अन्न फेकून मारतात. यामध्ये जे काही लग्नाचा मेन्यू असेल तो पदार्थ खाऊन जोडप्यांवर फेकतात. नवविवाहित जोडप्याने हे सहन केले, तर ते दोघे मिळून त्यांच्या वैवाहिक जीवनात सर्व प्रकारच्या अडचणींचा सामना करू शकतात, अशी या विधीमागील धारणा आहे.

फिजी

फिजीमध्ये अशी समजूत आहे की, जर प्रियकराने वडिलांकडून लग्नासाठी मुलीचा हात मागितला. आणि त्यांनी होकार दिला तर त्या बदल्यात मुलीच्या वडिलांना व्हेल माशाचा दात भेट म्हणून दिला जातो, जावई किती धाडसी आहे याचे हे प्रतिक समजले जाते.

Marriage Traditions
Marriage Dates : यंदा लग्नाळूंना पाहावी लागणार वाट, कोणत्या महिन्यात किती मुहूर्त जाणून घ्या

महिनाभर आधीच रडते वधू

लग्नात वधूचे रडणे सामान्य आहे. प्रत्येक मुलगी घर सोडण्यापूर्वी रडते. पण चीनमधील तुजिया समाजात लग्नाच्या एक महिना आधी वधूने रडण्याची परंपरा आहे. या समुदायात वधू तिच्या लग्नाच्या एक महिना आधी दररोज एक तास रडते.

लग्नाला 20 दिवस शिल्लक असताना वधूची आई देखील बसून रडायला लागते आणि लग्नाला 10 दिवस बाकी असताना वधूची आजी आणि आजी देखील एकत्र बसून रडतात.

स्पेन

इतर लग्नाच्या दिवशी वराचे मित्र त्याचा तयार करण्यासाठी मदत करतात. पण, स्पेनमध्ये लग्नाच्या दिवशी वराचे मित्र त्याचा टाय कापतात. इतकंच नाही तर लग्नात उपस्थित पाहुण्यांमध्ये कट टाय विकले जातात. टाय विकून मिळालेले पैसे वधू-वरांना सुपूर्द केले जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com