Milind Soman : 57 व्या वर्षीही मिलिंद एवढा हँडसम कसा? ; करतो फक्त चार गोष्टी!

Milind Soman
Milind Somanesakal

मिलिंद सोमण वयाच्या 57 व्या वर्षीही इतका हॉट आणि हँडसम कसा काय दिसतो. हे खरं तर सर्वांनाच पडलेलं कोडं आहे. कारण, त्याच्याच वयाचे अधिक व्यक्ती तर आता काठी टेकत नातवंड सांभाळत आहेत. पण, मिलिंद मात्र आजही अनेक तरूणींच्या स्वप्नातील राजकूमार बनलेला आहे.

तरूणींच्या मनातील त्याचे हे स्थान ‘मैने दिल दिया’ या गाण्यापासून अढळ आहे. त्या गाण्यातील त्याची एन्ट्री आणि बॉडी आजही अनेकींना भुरळ घालते. अशा या फिटनेस जपणाऱ्या हँडसम मिलिंदच्या तारूण्याचे रहस्य काय आहे. तो फिट राहण्यासाठी काय करतो, याबद्दल जाणून घेऊयात.

Milind Soman
Erectile dysfunction : मायक्रोवेवमध्ये अन्न गरम करणे धोक्याचे; तुम्ही देताय नपुंसकतेला निमंत्रण

भारताचा ‘आयर्न मॅन’ म्हटल्या जाणार्‍या मिलिंदचे त्याच्या फिटनेसमुळे केवळ भारतातच नाही तर इतर देशांतही त्याचे खूप चाहते आहेत. त्याचा फिटनेस पाहून बहुतेकांना असे वाटते की तो दिवसाचा बराचसा वेळ जिममध्ये घालवतो.

मिलिंद इतका फिट आहे म्हणजे तो दिवसभर जिममध्येच राहतो की काय, असे कदाचित तूम्हाला वाटेल. पण, तसे नाही. तो दिवसातील केवळ 15 मिनीटेच जिममध्ये वर्कआऊट करण्यात घालवतो.  हे त्यांनी स्वतः एकदा मीडियासमोर सांगितले होते. तसेच, त्याने एकदा एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले होते की 'मी दररोज फक्त 15 ते 20 मिनिटे व्यायाम करतो यावर फार कमी लोक विश्वास ठेवू शकतात.

Milind Soman
Curd And Raisins Benefits : दही आणि मणूके एकत्र खाण्याचे भरमसाठ फायदे; एकदा खाऊन बघाच!

या 15 मिनीटांसोबतच त्याने अशा काही चार गोष्टी अंगिकारल्या आहेत की, ज्यामुळे तो असा 20 वर्षाच्या तरूणासारखा दिसतो.

 

Milind Soman
Weight Loss Diet : नव्या वर्षात तरी बारीक व्हायचं मनावर घ्या; असा घ्या आहार

चांगल्या सवयी

मिलिंद चांगल्या लाइफस्टाइल मेंटेंन करतो. मिलिंद शरीराला हानिकारक ठरणाऱ्या स्मोकिंगसारख्या वाईट सवयीपासून दूर राहतो.

सकस आहार

तो दिवसाची सुरुवात चांगल्या आहाराने करतो. फिट राहण्यासाठी दिवसाची सुरूवात चांगली करणे आवश्यक आहे. त्यामुळे मिलिंद दिवसाची सुरुवात ड्रायफ्रूट्सने करतो. ही गोष्ट त्यांना तंदुरुस्त तर ठेवतेच शिवाय दिवसभर एनर्जीनेही भरलेली राहते.

Milind Soman
Long Distance Relationship : तुम्ही देशात, जोडीदार परदेशात; शरीरसुख कसे मिळवाल ?

आराम आहे गरजेचा

काम, व्यायाम आणि ताणतणाव यासोबत माणसाला पुरेसा आरामही फिट ठेवतो, असे मिलिंदचे म्हणणे आहे. शरीराला विश्रांती देणेही आवश्यक असते. त्यामूळेच तो बिझी शेड्युलमधून वेळ काढून आराम करतो.

सकारात्मक विचार

कोणतेही काम करण्यासाठी मन सकारात्मक असणे आवश्यक आहे. मग भलेही ते शरीराचा फिटनेस असेल. मिलिंद त्याच्या मानसिक आरोग्याची विशेष काळजी घेतो. त्यामूळे तो आनंदी आणि तणावविरहीत जगतो. त्यामूळेच त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आणि तेज ओसंडून वाहत असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com