New Year Celebration : न्यू इयरच्या पार्टीसाठी परफेक्ट कपल दिसायचंय? हे ऑप्शन्स खास तुमच्यासाठी

सध्या राऊंड नेक वरती चेक्सचा शर्ट घालण्याची फॅशन
New Year Celebration
New Year Celebrationesakal

New Year Celebration : न्यू इयर प्लॅन ठरला का? कुठे जायच आहे? कसं सेलिब्रेट करायच आहे? गेस्ट लिस्ट निघाली? अर्थात तुम्हाला तुमचं न्यू इयर नक्की कसा आणि किती लोकांसोबत अपेक्षित आहे यावरही या गोष्टी डीपेंड आहेत, पण त्याही पलीकडे एक गोष्ट या कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नाही.. आणि ती म्हणजे तुमचे न्यू इयर आउटफिट. कपल गोल्स म्हटले की त्यात सगळं कसं परफेक्ट हवं आणि न्यू इयर साठी तर ते खूप महत्वाच आहे, शिवाय असे प्रॉपर आउटफिट ठरवून तुम्ही तुमचे क्यूट फोटोशूट सुद्धा करू शकतात.

New Year Celebration
China Accident : थंडीने केला घात! धुक्यामुळे चायनाच्या 200 वाहनांचा ब्रिजवरती अपघात

पण यात नक्की काय करावं असा प्रश्न आहे? या आयडिया ट्राय करून बघा..

1. मॅचिंग चेक्स शर्ट

सध्या राऊंड नेक वरती चेक्सचा शर्ट घालण्याची फॅशन सुरूच आहे, आधीतरी मुलं किंवा स्वतःला टॉमबॉय समजणाऱ्या मुलीच अशी स्टायलिंग करायच्या, पण आता सगळेच अशी स्टाईल करता आहेत. अशात तुम्हीही आपल्या पार्टनर सोबत ही स्टाईल करू शकतात.

जर तुम्ही कुठे आउटिंगचा प्लॅन केलेला आहे तर हा लुक तुमच्यासाठी परफेक्ट आहे याने तुम्हाला दिवसभर कम्फर्टेबल वाटेल.

New Year Celebration
Mughals Ruled India : सेनापतींच्या जीवावर मुघलांनी भारतावर केलं होत राज्य

2. इंडो वेस्टर्न आउटफिट

जीन्स टि शर्ट किंवा वनपीस तर सगळेच घालतात पण त्यात जरा हटके काही प्लॅन असेल तर हा आउटफिट परफेक्ट आहे. दोघांसाठी ईकत किंवा कलमकरीचा आउटफिट तुम्ही घेऊ शकतात.

वन पीस आणि शॉर्ट कुर्ता हे कॉम्बिनेशन छान दिसेल, आणि तुमचा लूकही याने हटके बनेल.

New Year Celebration
New Year Celebration Outfit : न्यू ईयर पार्टीसाठी ट्राय करा समांथा अन् कियारासारखा खास लुक

3. कोट असलेले टि-शर्ट

क्यूट कपल्ससाठी हे टि शर्ट परफेक्ट आहेत, हे टि शर्ट कस्टमाइज असतात त्यामुळे यावरती तुम्ही हवे ते कोटसुद्धा लिहू शकतात. किंवा ऑनलाइन आणि बाजारात टिपिकल कोट असलेले टि शर्ट सुद्धा मिळतात.

4. शॉर्ट वनपीस आणि राऊंड नेक टि शर्ट

एकाच पॅटर्नचे वेगवेगळे आउटफिट सुद्धा तुम्ही कॅरी करू शकतात, यात तुम्ही लायनिंग असलेले ड्रेसेस घेऊ शकतात किंवा सध्या फ्लोरल वन पीस आणि शॉर्ट कुर्ता सुद्धा ट्रेंडिंग आहेत.

New Year Celebration
Astro Tips : गुरुवारी या गोष्टी केल्याने व्हाल कंगाल, वेळीच व्हा सावध

5. सेम कलरचे ड्रेसेस

प्रत्येकावेळी मॅचिंग करायच म्हणून परटिक्युलर ड्रेस घातला पाहिजे असं नाही, तुम्ही तुम्हाला हवा तो ड्रेस घालू शकतात फक्त दोघांच्या ड्रेसेसचा रंग सारखा ठेवा यानेही तुम्ही सुंदर स्टाईल करू शकतात.

6. ट्रेडीशनल आउटफिट

घरच्यांसोबत आहात? किंवा न्यू इयर साठी देवदर्शनाचा प्लॅन करता आहात? मग तिथे वेस्टर्न आउटफिट घालणं तुम्हालाच पटणार नाही त्यामुळे तुम्ही प्रॉपर ट्रेडिशनल लुक सुद्धा करू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com