Sleeping Tips : Night Shift करणाऱ्यांनी झोपेसाठी असं बनवावं वेळापत्रक, तरच आरोग्य राहील ठणठणीत!

तुमची शिफ्ट आणि झोपेमध्ये जास्त अंतर ठेवू नका
Sleeping Tips
Sleeping Tipsesakal

Sleeping Tips :

काहीलोक पोटासाठी निसर्गाच्या नियमांविरूद्ध जातात. त्यापैकी एक म्हणजे रात्रीचे काम करणे. निसर्गाने आपल्या झोपेसाठी एक वेळ निश्चित केली आहे. पण, लोक रात्रीची ड्युटी करून त्या नियमाविरूद्ध जातात. आजकाल बरेच लोक रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करतात. हे काम शरीराला जास्त थकवणारे असू आहे.

कारण, रात्रीची शांतता आणि रात्री झोपेची असलेली सवय यामुळे तुम्हाला झोप येऊ शकते. पण तरीही जागे राहून काम संपवावे लागते. रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांना पुरेशी झोप न मिळण्याचा त्रास होतो. त्याचा परिणाम त्यांच्या जीवनशैलीवर आणि खाण्याच्या सवयींवरही दिसून येतो, ज्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.

अशावेळी, तुम्ही कामाशी तडजोड करू शकत नाही, परंतु काही टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल घडवून आणू शकता. यामुळे झोपेशी संबंधित समस्यांपासूनही आराम मिळू शकतो.

Sleeping Tips
Sleep and Mood: झोपेचा Mood वर, mental health वर कसा परिणाम होतो? | World Sleep Day 2024

झोपेची वेळ निश्चित करा

तुम्ही रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत असाल किंवा दिवसा, तुमच्या झोपेसाठी नियोजित वेळ निश्चित करणे महत्त्वाचे आहे. दररोज एकाच वेळी झोपण्याचा आणि जागे करण्याचा प्रयत्न करा. तसेच, तुमची शिफ्ट आणि झोपेमध्ये जास्त अंतर ठेवू नका. दररोज ८ तास झोप घेणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

चांगल्या झोपेसाठी चाला

काहीवेळा शारिरीक थकवा घालवण्यासाठी चालणे हा उत्तम व्यायाम आहे. ज्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल. रोज संध्याकाळचा फेरफटका मारल्याने चांगली झोप येते. पण तुम्हाला रात्रीचे काम असल्याने तुम्ही सकाळी हा व्यायाम करू शकता. ज्यामुळे तुम्हाला दिवसभर ७ ते ८ तासांची झोप मिळेल.

Sleeping Tips
World Sleep Day 2024 : झोप उडाली आकाशी; या टीप्स आजमवाल तर कुंभकर्णासारखी गाढ झोप लागेल

कॅफिन आणि अल्कोहोलचे सेवन टाळा

एखाद्याला सतत कॉफी किंवा चहा पिण्याची सवय असते. पण असे वेळी-अवेळी चहा पिणे आरोग्यासाठी चुकीचे ठरते. कामाच्या शिफ्ट दरम्यान किंवा नंतर चहा कॉफीचे अति सेवन करू नका. कॅफीन शरीराला सक्रिय ठेवण्याचे काम करते. ज्यामुळे तुम्हाला झोपेची आवश्यकता असतानाही झोप येत नाही.

Sleeping Tips
Sleep Disorders and Problems : पूर्ण झोप होत नाही, दिवसा झोप येते?

झोपेसाठी पुरक वातावरण बनवा

शांत झोपेसाठी घरात वातावरण अनुकूल बनवा. जेणेकरून झोपताना कोणतीही समस्या उद्भवू नये. दिवसा झोपायचे असते त्यामुळे प्रकाश रोखण्यासाठी तुम्ही पडदे किंवा डोळ्यावरील पट्टी देखील वापरू शकता. झोपण्यापूर्वी मोबाईल वापरणे टाळा, कारण त्यातून बाहेर पडणारा प्रकाश झोपेमध्ये व्यत्यय आणू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com