Ginger Storing Tips : आलं दीर्घकाळ टिकवण्यासाठी फॉलो करा या टिप्स, आलं अजिबात खराब होणार नाही

आलं दीर्घकाळ टिकवण्यासाठी आम्ही काही टिप्स सांगणार आहोत
Ginger Storing Tips
Ginger Storing Tipsesakal

Ginger Storing Tips : दिवसभराच्या थकव्यानंतर ऑफिसमधून घरी परतल्यावर अनेकांना कडक चहा प्यायची सवय असते. कडक चहासाठी आलं लागतंच. मात्र अनेक औषधी गुणधर्मांनी युक्त आलं व्यवस्थित ठेवलं नाही तर ते लवकर खराब होतं. तुमच्या घरीसुद्धा आलं जास्त प्रमाणात वापरल्या जात असेल तर त्याला दीर्घकाळ टिकवण्यासाठी आम्ही काही टिप्स सांगणार आहोत.

आल्याची पेस्ट

तुम्हाला आलं दीर्घकाळ टिकवायचं असेल तर आल्याची पेस्ट करून ती काचेच्या जारमध्ये ठेवा. काचेच्या जारमध्ये ठेवल्याने बुरशी लागणार नाही आणि दीर्घकाळ फ्रेश राहील. या जारला तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू शकता किंवा अशा जागी ठेवा जी जागा थंड असेल आणि मोकळी हवा येईल. या पद्धतीने तुम्ही कित्येक महिने आल्याची पेस्ट टिकवू शकता. (Ginger)

Ginger Storing Tips
Food Storage : अंडी फ्रीजमध्ये ठेवताय ? या गोष्टींची काळजी घ्या

आईस क्यूब्स बनवून ठेवा

आल्याची पेस्ट स्टोअर करण्याचा हा उत्तम उपाय आहे. त्यासाठी आल्याची पेस्ट बनवून बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा. मात्र ही पेस्ट बनवताना घ्यायची दक्षता म्हणजे बर्फाच्या ट्रेमध्ये ही पेस्ट घालताना त्यात अजिबात पाणी टाकू नका. या पद्धतीने पेस्ट तुम्ही तीन महिने वापरू शकता. (Lifestyle)

Ginger Storing Tips
Benefits Of Ginger: सलग 30 दिवस करा आल्याचं सेवन, ‘हे’ आजार होतील दूर!

पेपर बॅग

आलं दीर्घकाळ स्टोअर करण्यासाठी पेपर बॅग किंवा पेपर टॉवेलमध्ये चांगल्या पद्धतीने गुंडाळून तुम्ही दीर्घकाळ टिकवू शकता. आता ही बॅग फ्रिजमध्ये ठेवा. अशा पद्धतीने ठेवा की त्याला थोडीही हवा किंवा मॉइश्चर लागू नये. हे आलं वापल्यानंतर बॅग पुन्हा त्याच पद्धतीने बंद करून ठेवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com