Weightlifting exercise : मैत्रिणींनो वेटलिफ्टींगचेही आहेत अनेक फायदे, आजपासूनच करा वेटलिफ्टींगचा श्रीगणेशा!

ताकद वाढवण्यासाठी वेटलिफ्टिंग कसे करावे
Weightlifting exercise
Weightlifting exercise esakal

Weightlifting exercise : महिला पुरूषांसारखेच व्यायाम अन् खाण्यापिण्याची काळजी घेऊ लागल्या आहेत. त्या वॉकिंग, योगा, स्ट्रेचिंग आणि डायटही करतात. पण, त्या वेटलिफ्टिंगकडे फारसे लक्ष देत नाहीत. खरं तर, तरूणांचा फेव्हरेट असलेल्या वेटलिफ्टिंगचे अनेक फायदे आहेत.

वेटलिफ्टिंग हा एक व्यायाम आहे जो पुरुषांपेक्षा स्त्रिया कमी करतात. पण वेटलिफ्टिंग हे पुरुषांसाठी जेवढे फायदेशीर आहे तेवढेच महिलांसाठीही आहे. इतर व्यायामाप्रमाणेच महिलांनीही वेटलिफ्टिंग करावे. सध्या नकोसे वाटत असले तरी याचे फायदे जाणून घेतल्यानंतर महिलाही याची सुरूवात करतील.

हे जाणून घेतल्यावर महिलाही हा व्यायाम करायला लागतील. मात्र, गर्भधारणेदरम्यान आणि मासिक पाळीदरम्यान महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेटलिफ्टिंगचे व्यायाम करावेत.

Weightlifting exercise
Weight Loss सोबतच Quinoaचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे, आजच आहारात ट्राय करा क्विनोआच्या रेसिपी

महिलांसाठी वेटलिफ्टिंगचे फायदे

ताकद वाढवण्यासाठी वेटलिफ्टिंग

वेटलिफ्टिंगचा व्यायाम बॉडी बनवण्यासाठी आणि ताकद वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतो. दररोज वेटलिफ्टिंग केल्याने, तुम्ही अधिक ऍक्टीव्ह आणि तंदुरुस्त राहाल. जर तुम्ही वेटलिफ्टिंग करत असाल तर त्यासोबत प्रोटीनयुक्त आहार घ्या. म्हणजे तुमच्या शरीराला पुरेशा प्रमाणात पोषणही मिळेल.

हाडांच्या मजबुतीसाठी वेटलिफ्टिंग

महिलांना प्रसुतीनंतर कंबरदुखीचा सामना करावा लागतो. वेटलिफ्टिंग हाडांना मजबूत करते. त्यामुळे ३० नंतर हाडांमध्ये होणाऱ्या वेदना कमी होतात. वयाची ३० शी ओलांडलेल्या महिलांनी तर हा व्यायाम केलाच पाहिजे. जे लोक वेटलिफ्टिंग करतात त्यांच्या हाडांवर दबाव पडतो, ज्यामुळे नवीन हाडांच्या पेशी तयार होतात. महिलांनी हाडे मजबूत करण्यासाठी वेटलिफ्टिंगचा व्यायाम करावा.

Weightlifting exercise
Exercise For Height तुमच्या मुलांची उंची वाढत नाहीय? त्यांच्या वर्कआऊट रूटीनमध्ये या 5 साध्यासोप्या व्यायामांचा करा समावेश

पचनसंस्थेचे कार्य सुरळीत राहते

आरबट चरबट खाण्याच्या सवयींमुळे सगळ्यांनाच पचनाचा त्रास होत आहे. महिलांचे खाने जरी व्यवस्थित असले तरी व्यायामाच्या आभावामुळे त्यांच्यामध्ये पोटाच्या तक्रारी अधिक असतात. अशावेळी वेटलिफ्टिंग करणे फायद्याचे ठरेल. यामुळे ज्यामुळे कॅलरी बर्न करण्याचा प्रवास सुलभ होतो. जर तुम्ही शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी कठोर परिश्रम करत असाल, तर वेटलिफ्टिंगचा व्यायाम सुरू करा.

हृदयाच्या आरोग्यासाठी वेटलिफ्टिंग

वेटलिफ्टिंगमुळे शरीरातील रक्त प्रवाह सुधारतो. आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. त्यामुळे तुम्ही हृदयविकार टाळू शकता. यासोबतच वेटलिफ्टिंगच्या व्यायामामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रासही कमी होतो.

मानसिक समस्यांसाठी वेटलिफ्टिंग

मध्यंतरी एक सर्व्हे करण्यात आला होता. त्यात, पुरूषांपेक्षा अधिक मानसिक तणाव महिलांना सहन करावा लागतो असे म्हटले होते. तुम्हालाही मानसिक त्रास होत असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी वेटलिफ्टिंग करू शकता. यामुळे तुम्ही तणावापासून दूर राहू शकता. वास्तविक, स्ट्रेंथ ट्रेनिंग शरीरात एंडोर्फिन हार्मोन सोडते, ज्यामुळे मूड सुधारतो आणि तणावासारख्या समस्या दूर होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com