Narayan Rane
Narayan Raneesakal

Neelam Rane : 'पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्यासाठी नारायण राणेंना पुन्हा सेवेची संधी द्या'

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.
Summary

गेली ३५ वर्षे श्री. राणे जिल्ह्याविषयी विकासाचे स्वप्न घेऊन काम करीत आहेत. त्यामुळे ते खासदार झाले तर आणखी बळकटी मिळेल.

म्हापण : सिंधुदुर्गवासीयांच्या विकासासाठी गेली ३५ वर्षे अहोरात्र काम करीत असलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना खासदारकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी द्या, असे आवाहन नीलम राणे (Neelam Rane) यांनी परुळे बाजार येथील महिला मेळाव्यात केले. लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार राणे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने सौ. राणे यांनी परुळे येथून प्रचाराचा शुभारंभ केला.

Narayan Rane
Kolhapur Lok Sabha : शाहू महाराजांविरोधात निवडणूक लढवणारे काँग्रेसचे बंडखोर नेते बाजीराव खाडे 6 वर्षांसाठी निलंबित

यावेळी भाजप (BJP) महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, माजी सभापती अस्मिता बांदेकर, कुडाळ नगरसेवक संध्या तेरसे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुमेधा पाताडे, अॅड. सुषमा खानोलकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब, भाजप तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, माजी सभापती वंदना किनळेकर, सारिका काळसेकर, बाजार समिती सदस्य सुजाता देसाई, माजी पंचायत समिती सदस्य गौरवी मडवळ, माजी सरपंच प्राजक्ता चिपकर, परुळे बाजार ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्वेता चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य प्रणाली बंगे, ग्रामपंचायत सदस्य सीमा सावंत, भाजप बूथप्रमुख दीपा दाभोलकर यांच्यासह म्हापण जिल्हा परिषद मतदारसंघातील महिला पदाधिकारी व महिला वर्ग उपस्थित होता.

Narayan Rane
Sangli Lok Sabha : 'मशाल' पेलायला 'हात' मिळणार का? विशाल पाटलांच्या बंडखोरीने शिवसेना चिंतेत

यावेळी माजी सभापती नीलेश सामंत, कुशेवाडा सरपंच नीलेश दत्तात्रय सामंत, प्रसाद पाटकर, प्रकाश राणे, म्हापण ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ मडवळ यांसह पदाधिकाऱ्यांनी सौ. राणे यांचे स्वागत केले. यावेळी श्वेता कोरगांवकर, सुमेधा पाताडे यांनीही मनोगत व्यक्त केले. माजी सभापती वंदना किनळेकर यांनी सूत्रसंचालन केले. दीपा दाभोलकर यांनी आभार मानले.

Narayan Rane
कोकणाला 'मशाली'ची गरज नाही, राऊतांनी आता राजकारणातून निवृत्ती घेऊन आपल्या कुटुंबाला वेळ द्यावा; केसरकरांचा सल्ला

मोदींचे हात बळकट करू

सौ. राणे म्हणाल्या, ‘‘विविध जनकल्याणकारी योजना राबविणाऱ्या व भारत देशाची मान जगभरात उंचावणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी कामाला लागा. गेली ३५ वर्षे श्री. राणे जिल्ह्याविषयी विकासाचे स्वप्न घेऊन काम करीत आहेत. त्यामुळे ते खासदार झाले तर आणखी बळकटी मिळेल. आपण राणे कुटुंबीयांना गेली ३५ वर्षे भरपूर प्रेम दिलेत. तसेच यापुढेही द्याल. न मागता सर्व काही देणाऱ्या मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com