Parbhani
Parbhani

परभणी सेनेकडे, गंगाखेड रासप, पाथरीत कॉंग्रेस । Election Results 2019

परभणी : पाथरी मतदार संघात कॉंग्रसचे उमेदवार सुरेश वरपुडकर यांनी अतितटीच्या लढतीत जवळपास त्यांचा विजय निश्चीत झाला असून केवळ औपचारीक घोषणा बाकी आहे.तिकडे गंगाखेड मतदार संघातही रासपचे रत्नाकर गुट्टे यांचा देखील तुरुंगात राहुन देखील विजयावर शिक्कामोर्तब केले आहे.तर परभणी मतदार संघात शिवसेनेच्या आमदार डॉ.राहुल पाटील यांनी मोठा विजय मिळवला आहे.

पाथरी मतदार संघात मोहन फड आणि सुरेश वरपुडकर यांच्या लढत झाली.वरपुडकर हे कॉंग्रेस-राष्ट्रवादीआघाडी सरकार मध्ये 2008 मध्ये मंत्री राहीले आहेत.2014 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत कॉंग्रेसमध्ये प्रवेश करुन 2014 ची निवडणुक लढवली होती.मात्र त्यांना पराभव स्विकारावा लागला.या निवडणुकीत त्यांनी प्रचारापासून आघाडी घेतली होती.

फड यांच्या उमेदवाराची घोळ उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत सुरु राहीला.ही जागा शिवसेनेची असतानाही फड यांच्यासाठी जागा सोडवत रिपाईंला जागा देण्यात आली.त्यामुळे रिपाईच्या कोट्यातून त्यांननी उमेदवारी दाखल केल्याने तेथील नाराज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचारापासून अंग चोरण्याची भुमीका घेतली.नेमकी हीच बाब फड यांच्या पराभवासाठी कारणीभुत ठरल्याचे जाणकार सांगत आहेत.वरपुडकर यांना 1 लाख 5 हजार 22 तर फड यांना 90 हजार 351 मते मिळाली असून 14 हजार 671 मतांनी विजय मिळवला आहे.

गंगाखेड मतदार संघात शिवसेनेला जागा सुटली असतानाही रासपने बंडखोरी करत उद्योजक रत्नाकर गुट्टे यांना उमेदवारी दिली होती.साखर कारखान्यातील गैरव्यवहार प्रकरणी गुट्टे हे तुरुंगात आहेत.त्यांनी तुरुंगात राहून प्रचारात आघाडी घेतली होती.पहिल्या फेरीपासून गुट्टे आणि शिवसेनेचे विशाल कदम यांच्यात अतितटीचा सामना झाला.अखेरच्या फेरी अखेर  गुट्टे हे 38 हजार 3 तर कदम यांना 28 हजार 478 मते 12 व्या फेरी अखेर मिळाली आहेत.जवळपास गुट्टे विजयाजवळ पोचले असून समर्थकांनी जल्लोष सुरु केला आहे.विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे उमेदवार मधुसुदन केंद्रे यांचा अत्यंत दारुण असा पराभव झाला असून त्यांना चौथेही  स्थान मिळाले नाही.

परभणीत शिवसेनेचे राहुल पाटील यांनी एकतर्फी विजय मिळवल्याचे जवळपास निश्चीत झाले आहे.पाटील यांना 67 हजार 490,एमआयएमचे अली खान यांना 16 हजार 538 मते मिळाली आहेत.त्यामुळे तब्बल 50 हजार 952 मतांनी आघाडीवर आहेत.कॉंग्रेसचे उमेदवार रविराज देशमुख यांना तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com