उदयनराजेंनी दिवसा केव्हाही माझ्या घरी यावे; शरद पवारांचा टोला

ncp leader sharad pawar press conference pune udayanraje bhosale statement
ncp leader sharad pawar press conference pune udayanraje bhosale statement

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्याबाबत व्यक्त केलेल्या भावनांवर आज, खुद्द शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सातारा लोकसभा निवडणूक लढवण्याची माझी कसलीही तयारी नाही, असा खुलासा आज, पवार यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत केला.

काय म्हणाले होते उदयनराजे?
उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत जर, शरद पवार माझ्या विरोधात उभे राहिले, तर मी निवडणूक लढवणार नाही, अशी भूमिका उदयनराजे यांनी स्पष्ट केली होती. तसेच ‘फक्त पवारसाहेबांनी दिल्लीतील त्यांच्या निवास्थानाचे आणि त्यांच्या गाडीचे दरवाजे माझ्यासाठी खुले ठेवावेत,’ असे उदयनराजे म्हणाले होते. त्यावर आज, पुण्यातील पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले पवार?
पवार म्हणाले, ‘उदयनराजे भोसले यांनी माझ्याविषयी ज्या भावना व्यक्त केल्या. त्यात मला निवडणूक लढवून भर टाकायची नाही. मी यापूर्वीच कोणत्याही प्रकारची निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सातारा लोकसभा निवडणूक लढवण्याचा माझा कोणताही मनोदय नाही. उदयनराजे यांनी दिल्लीतील माझ्या निवासस्थानाचा उल्लेख केला. तर, माझ्या दिल्लीतील निवासस्थानाचे दरवाजे त्यांच्यासाठी कायम खुले आहेत. दिवसा त्यांनाही केव्हाही माझ्या निवासस्थानी यावे.’

साताऱ्यात राष्ट्रवादीकडून कोण?
साताऱ्यात उदयनराजे भोसले यांच्या विरोधातील उमेदवारीविषयी शरद पवार यांना विचारण्यात आले. त्यावर पवार म्हणाले, ‘या संदर्भात आम्ही काही उमेदवारांची चाचपणी केली आहे. त्यात काही ज्येष्ठ मंडळी तसेच काही स्थानिक नेत्यांचा समावेश आहे. येत्या दोन दिवसांत बैठक घेऊन आम्ही उमेदवारीविषयीचा अंतिम निर्णय घेणार आहोत.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com