esakal | Breaking : राज्यात दिवसभरात विक्रमी संख्येत आढळले कोरोना रुग्ण; साडेसहा हजाराचा टप्पा गाठला!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Patients

पुण्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या आकड्याने शंभरी पार केली असून, दिवसभरात 104 रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या पावणेनऊशे इतकी झाली आहे.

Breaking : राज्यात दिवसभरात विक्रमी संख्येत आढळले कोरोना रुग्ण; साडेसहा हजाराचा टप्पा गाठला!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यात नव्या रुग्णांचा आकडा थोडासा कमी झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांना दिलासा मिळाला खरा; पण हाच आकडा गुरुवारी (ता.23) तब्बल 778 पर्यंत गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

त्यामुळे राज्यभरातील रुग्णसंख्या साडेसहा हजारापर्यंत गेली आहे. तर दिवभरात 14 जणांचा जीव गेल्याने मृतांची संख्या 283 झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत 840 रुग्ण बरे झाले आहेत. 
राज्यात बुधवारी दिसभरात 431 रुग्ण सापडले होते. मात्र, गुरुवारी ही संख्या इतक्‍या झपाट्याने वाढली असून, ती पावणे आठशेपेक्षा अधिक आहे. 

- लॉकडाऊननंतर साखरेचे दर वाढणार की कमी होणार? देशात 'अशी' आहे साखर उद्योगाची स्थिती!

मृतांमध्ये मुंबईतील सहा, पुणे पाच नवी मुंबई, नंदुरबार आणि धुळे येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. त्यात आठ पुरुष आणि सहा महिला आहेत. गंभीर बाब म्हणजे, नऊ मृत व्यक्ती या 40 ते 59 या वयोगटातील आहेत. मृतांना उच्चरक्तदाब, मधुमेह, अस्थमा, हृदयाचे त्रास असल्याचेही पुढे आले आहे.

राज्यभरातून आतापर्यंत तपासणीसाठी पाठविलेल्या 96 हजार 369 पैकी 89 हजार 561 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, त्यातील 6 हजार 427 जण कोरोनाबाधित आहेत. या कोरोनाबाधितांपैकी 840 जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

- Coronavirus : भारतीय पुरुष का ठरताहेत कोरोनाचे सर्वाधिक बळी? 'ही' आहेत त्याची कारणे

सध्या राज्यभरातील 27 लाख 26 हजार लोकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे. ज्या लोकांना ताप, थंडी, सर्दी, खोकला आहे; अशा सुमारे 1 लाख 14 हजार जणांना घरीच विलग ठेवण्यात आले आहे. तर 8 हजार 702 जण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. 

सोमवारी दिवसभरातील नवे रुग्ण  778 
एकूण रुग्ण 6,427 
मृत  14 
एकूण मृत  283 
बरे झालेले एकूण रुग्ण  840

- अमेरिकेने WHO चा निधी रोखल्यानंतर चीनची मोठी घोषणा; अतिरिक्त मदतनिधी केला जाहीर!

पुण्यात दिवसभरात सापडले 104 रुग्ण

पुण्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांचया आकड्याने शंभरी पार केली असून, दिवसभरात 104 रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या पावणेनऊशे इतकी झाली आहे. गेल्या सव्वामहिन्यांत पहिल्यांदाच सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने पुणेकर पुन्हा धास्तावले आहेत. त्याचवेळी दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाला आहे; तर 36 जणांची प्रकृती गंभीर आहे. कोरोनामुक्त झालेल्या आठ जणांना घरी सोडण्यात आले आहे.