esakal | Coronavirus : भारतीय पुरुष का ठरताहेत कोरोनाचे सर्वाधिक बळी? 'ही' आहेत त्याची कारणे
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Virus-Death

जॉन हॉपकिन विद्यापीठाच्या संशोधक सब्रा क्लिन यांनी नमूद केलं आहे की, बहुतांश विषाणूंचा प्रादूर्भाव हा श्वसनसंस्थांमधून होतो. पुरुषांमध्ये कमी झालेली रोग प्रतिकारशक्ती आणि इतर आजारांमुळे विषाणूंचा संसर्ग लवकर होतो.

Coronavirus : भारतीय पुरुष का ठरताहेत कोरोनाचे सर्वाधिक बळी? 'ही' आहेत त्याची कारणे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना विषाणूंच्या संसर्गामुळे स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांच्या मृत्यूचे कारण त्यांच्या गुणसूत्रात सापडले आहे. वाय गुणसूत्र कमुवत होत असल्याने विषाणूंविरोधात लढण्याची पुरुषांची क्षमता कमी झाली. स्त्रियांमधील एक्स, एक्स या गुणसुत्रांमुळे विषाणूंचा शरीरात प्रसार रोखला जातो, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सध्या जगभरात उद्रेक झालेला कोरोना असो की, यापूर्वी आलेल्या सार्ससारख्या मोठ्या साथी, या प्रत्येक साथीत मृत्यूमुखी पडणाऱयांमध्ये स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. कोरोनाच्या साथीत जगभरात मृत्यू झालेल्यांपैकी 68 ते 70 टक्के पुरूष आहेत. या मागचं नेमक कारण संशोधकांनी शोधून काढलं. जॉन हॉपकिन विद्यापीठाच्या संशोधक सब्रा क्लिन यांनी नमूद केलं आहे की, बहुतांश विषाणूंचा प्रादूर्भाव हा श्वसनसंस्थांमधून होतो. पुरुषांमध्ये कमी झालेली रोग प्रतिकारशक्ती आणि इतर आजारांमुळे विषाणूंचा संसर्ग लवकर होतो. 

Coronavirus : बिल गेट्स यांच्याकडून मोदी सरकारचे कौतुक

स्त्रियांमध्ये एक्स-एक्स अशी गुणसूत्रे असतात. त्यांच्यातील जीन्स आणि आँस्ट्रेजेन्समुळे विषाणूंच्या प्रसार रोखला जातो. पुरूषांमध्ये एक्स आणि वाय ही दोन्ही गुणसूत्रे असतात. त्यातील वाय गुणसूत्रे कमकुवत होत आहेत. सुमारे 200 ते 300 दशलक्ष वर्षांमध्ये वाय गुणसूत्रांमधून 580 जीन्स कमी झाल्या आहेत.

सध्या वाय गुणसूत्र एक्सशी फक्त 19 जीन्स संबंध येतो, असा अभ्यास झाल्याची माहिती पुण्यातील एशियन इंन्स्टिट्युट ऑफ मेन्स हेल्थकेअरचे संचालक, मूत्ररोगतज्ज्ञ आणि रोबोटीक सर्जन डॉ. आर. के. शिंपी यांनी दिली.

- अमेरिकेने WHO चा निधी रोखल्यानंतर चीनची मोठी घोषणा; अतिरिक्त मदतनिधी केला जाहीर!

पुरुषांचे आयुर्मान का कमी होतंय?
बहुतांश पुरुष स्वतःच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी करत नाहीत. प्रतिबंध आणि लवकर निदान याकडे दुर्लक्ष करण्याची पुरुषांना सवय असते, असा निष्कर्ष गेल्या पाच वर्षांमध्ये 35 हजार पुरूषांची तपासणी विश्लेषणातून निघाला आहे, असे डॉ. शिंपी यांनी सांगितले.

पुरुषांचे आरोग्य चांगले नसल्याची कारणे :
- जीवशास्त्रीय कारणे : आक्रमतेतून येणारा हृदयविकार, ताणतणाव
- पर्यावरणीय कारणे : कामाच्या ठिकाणी होणारे अपघातातून आरोग्य चांगले रहात नाही
- वर्तणुकीविषयी कारणे : रस्त्यावरील अपघात, मद्यपान, धूम्रपान, सकस आहाराचा अभाव, मनःशांती नाही.

Coronavirus : कोणतीही चूक करु नका; जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा 

भारतीय नागरिकांचे सरासरी आयुर्मान :

पुरुषांचे सरासरी आयुर्मान : 64 वर्षे 4 महिने
स्त्रियांचे सरासरी आयुर्मान : 67 वर्षे 2 महिने

पुरुषांमधील मृत्यूची कारणे :

वेगवेगळे असाध्या आजार 70 टक्के
मधुमेहातील गुंतागुंत 50 टक्के
कर्करोग 40 टक्के