Dental Medical College : आरोग्य विद्यापीठाकडून त्या महाविद्यालयांना संलग्‍नता; दंत वैद्यकीयच्या हजार जागांची संधी

medical officers
medical officerssakal

Dental Medical College : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशप्रक्रियेत सात वैद्यकीय महाविद्यालये व एक दंत महाविद्यालयाकडून परवानग्‍यांच्या पूर्ततेअभावी सीईटी सेलने पहिल्‍या फेरीत सहभागी केले नव्‍हते. (Affiliation to Dental Medical colleges from Health University news)

संबंधित महाविद्यालयांनी महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाला याबाबत हमीपत्र सादर केले असून, त्‍याआधारे विद्यापीठाने संलग्‍नता प्रदान केली आहे. त्‍यामुळे दुसऱ्या फेरीत या महाविद्यालयातील सुमारे एक हजार जागांसाठी विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे सात वैद्यकीय व एक दंत महाविद्यालयातर्फे त्रुटी पूर्तता करण्याबाबत हमीपत्र सादर केले आहे. त्‍याआधारे महाविद्यालयांना संलग्नता दिली असून, महाविद्यालयांच्या एकूण एक हजार जागांसाठी प्रवेश घेणे शक्य होणार आहे. प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ म्‍हणाले, की महाविद्यालयांमार्फत अपुरी शिक्षकसंख्या असल्याने संलग्नतेबद्दल त्रुटी निर्माण झाल्या होत्या.

महाविद्यालयांमार्फत प्रतिनिधींनी आवश्यक असणाऱ्या शिक्षकसंख्येच्या त्रुटींच्या पूर्ततेबद्दल कार्यवाही केली जाईल, अशा आशयाचे हमीपत्र विद्यापीठाला सादर केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

medical officers
Medical Admission : वैद्यकीय प्रवेशाला सोमवारपासून सुरवात; पहिल्या फेरीची अंतिम निवड यादी जाहीर

विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन विद्यापीठातर्फे त्यांना संलग्नता देण्यात आली.

कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ म्‍हणाले, की राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाला विद्यापीठातर्फे महाविद्यालय व त्यांच्या प्रवेश क्षमतेबद्दल अवगत केले आहे. त्‍यामुळे आता पुढील फेरीत या जागांवर प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार आहे.

या महााविद्यालयांचा समावेश-

महात्‍मा गांधी इन्‍स्‍टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्‍सेस (सेवाग्राम, वर्धा), तेरणा मेडिकल कॉलेज (नवी मुंबई), एसीपीएम मेडिकल कॉलेज (धुळे), डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज (अमरावती), डॉ. एन. वाय. तासगावकर इन्‍स्‍टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्‍स (कर्जत), सिंधूदुर्ग शिक्षणप्रसारक मंडळ मेडिकल कॉलेज (सिंधुदुर्ग), वेदांता मेडिकल कॉलेज (पालघर), टीपीसीटी तेरणा डेंटल कॉलेज (नवी मुंबई).

medical officers
Medical Admission : साडेसतरा हजार जागांसाठी 51 हजार विद्यार्थ्यांचे अर्ज; प्रवेशासाठी वाढणार चुरस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com