विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम, अनिल परब आज माध्यमांशी बोलणार

Anil Parab
Anil Parab sakal media
Updated on

मुंबई : एसटी महामंडळाचे (ST Strike) राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीवर ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागते आहे. वाढीव पगारवाढ देऊनही एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. जवळपास महिनाभर राज्यातील एसटी कर्मचारी संपावर बसले असून, मेस्मा कायद्या अंतर्गत (mesma) कारवाईचे परिवहन मंत्र्यांनी संकेत देऊनही एसटी कर्मचारी संप मागे घ्यायला तयार नाहीत. आज परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) हे माध्यमांशी बोलणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान परब आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

परिवहन मंत्री अनिल परब हे माध्यमांशी बोलणार

यानंतर आता परिवहन मंत्री एसटी संघटनाशी देखील चर्चा करून काय तोडगा काढता येईल संप कसा मिटवता येईल यावर माहिती घेत आहेत. आज परिवहन मंत्री अनिल परब हे माध्यमांशी बोलणार असल्याची माहिती मिळत आहे. अनिल परब आज काय बोलणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. हा संप मिटेल असे जरी सरकारकडून सांगितले जात असले तरी कर्मचारी मात्र अजूनही संपावर ठाम आहेत.

Anil Parab
''तैवान लष्कर प्रमुख आणि बिपीन रावत यांची हेलिकॉप्टर दुर्घटना समान''

एसटीतील निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या १० हजारांवर

संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबन, सेवा समाप्ती किंवा बदलीची कारवाई करण्याचा एककलमी कार्यक्रम एसटी महामंडळाने सुरू केला असून बुधवारपर्यंत महामंडळातील तब्बल १० हजार ३० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर रोजंदारीवरील दोन हजार २७ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे.

Anil Parab
‘पॅनेक्स-२१’साठी बिपिन रावत येणार होते पुण्यात

गेला सव्वा महिना एसटीचे कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी बेमुदत संपावर गेले आहेत. हा संप मोडून काढण्यासाठी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना अंतरिम वेतन वाढ देण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार जे कर्मचारी संपकाळात कामावर हजर होते त्यांना ७ डिसेंबरला वेतन अदा करण्यात आले. मात्र संपावर ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांविरोधात महामंडळाने निलंबनाची कारवाई सुरू केली असून बुधवारी १२० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. आत्तापर्यंत निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या १० हजार ३० झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com