"महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री तरी हिंदूंना एकत्र करणे म्हणजे चोरी!"

काश्मीर फाईल्स सिनेमा संपल्यानंतर काही लोक हिंदूंना गोळा करून भाषण करतात, असे वक्तव्य गृहमंत्री वळसे पाटील यांनी केले होते
Atul Bhatkhalkar
Atul Bhatkhalkar सकाळ डिजिटल टीम

काश्मीरमधील हिंदुंचे भयानक शिरकाण दाखविणारा सिनेमा द काश्मीर फाईल्स 1 मार्च रोजी हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमाची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. हा सिनेमा सर्वांना पाहता यावा यासाठी भाजपशासित राज्ये विशेष प्रयत्न करताना दिसत आहेत. अशात काश्मीर फाईल्स सिनेमा संपल्यानंतर काही लोक हिंदूंना गोळा करून भाषण करतात, असे वक्तव्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले होते. यावर भाजप नेते अतुल भातकळकर यांनी ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधलाय.

भाजप नेते अतुल भातकळकर ट्वीट द्वारे म्हणाले, “काश्मीर फाईल्स सिनेमा संपल्यानंतर काही लोक हिंदूंना गोळा करून भाषण करतात, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील विधानसभेत म्हणाले. शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, पण महाराष्ट्रात हिंदूंना एकत्र करण्याची चोरी झाली आहे.”

Atul Bhatkhalkar
'फक्त धर्माविषयी नाहीतर...', हिजाबवरील निकालानंतर मेहबूबा मुफ्ती नाराज

महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना हिंदूंना एकत्र करण्याची चोरी झाली, हे आश्चर्यकारक असल्याच्या आशयातून भातखळकरांनी ट्वीट केले.

अनुपम खेर यांची मुख्य भूमिका असलेला ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट 11 मार्च 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात 1990 च्या नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा मांडण्यात आली आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ने बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई केली आहे. शनिवार आणि रविवारी या चित्रपटाच्या कमाईत लक्षणीय वाढ झाली आहे. अनुपम खेर, दर्शन कुमार आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट IMDb रेटिंग्जमध्येही अव्वल ठरला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com