Maharashtra Monsoon Return : राज्यात 10 ते 15 ऑक्टोबरला परतीच्या पावसाची शक्यता

Rain
Rainesakal

Maharashtra Rain News : जिल्ह्यात शनिवार (ता. ७)पासून पाच दिवस हवामान स्वच्छ आणि कोरडे राहण्याची शक्यता इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्रातर्फे वर्तविण्यात आली आहे. (Chance of rain return in state from October 10 to 15 maharashtra news)

त्याचवेळी हवामानशास्त्राच्या अभ्यासकांनी राज्यात १० ते १५ ऑक्टोबरला परतीचा पाऊस हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली. शिवाय बंगालच्या उपसागरातील छोट्या वादळामुळे दिवाळीत १० ते १५ नोव्हेंबरच्या दरम्यान एक दिवस पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

परतीचा पाऊस शंभर मिलिमीटरपर्यंत अपेक्षित असल्याचे हवामानशास्त्र अभ्यासकांचे म्हणणे आहे. शिवाय दिवाळीत २५ मिलिमीटरपर्यंत पावसाची त्यांनी शक्यता वर्तवली. जिल्ह्यात आता पाच दिवस अंशतः ढगाळ ते निरभ्र आकाश राहील.

Rain
Nashik Agriculture News: शेतशिवार फुलल्याने शेतमजुरांना दिलासा; डाळिंबासह इतर फळपिकेही बहरली

तापमान कमाल ३१ ते ३४, किमान १९ ते २१ अंश सेल्सिअस, वाऱ्याचा वेग तासाला सात ते नऊ किलोमीटर राहण्याची शक्यता आहे.

पाच दिवसांमधील हवामानाच्या अंदाजाच्या पार्श्‍वभूमीवर इगतपुरी केंद्राच्या शास्त्रज्ञांनी परिपक्व झालेली खरीप पिकांची लवकर कापणी व मळणी पूर्ण करून घ्यावी आणि पिकांना उन्हात चांगले वाळवून सुरक्षित जागेवर साठवून ठेवावे, असा सल्ला शेतकऱ्यांना दिला.

Rain
Monsoon Return: पश्‍चिम राजस्थानमधून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरु; हवामान विभागाची माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com