नव्या सरकारचा शपथविधी नियमबाह्य असल्याने रद्द करा : चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

मंत्र्यांनी शपथ घेताना नेत्यांची नावेघेतली हे नियमबाह्य असून हा शपथविधी रद्द करा अशी मागणी भाजपा आमदाराने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे याचिकेद्वारे केली आहे अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

मुंबई : उद्धव ठाकरे सरकारने नियमबाह्य काम सुरु केले आहे. शपथविधी सोहळ्यामध्ये मंत्र्यांनी शपथ घेताना आपापल्या नेत्यांची नावे घेतली हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे सरकारचा शपथविधी रद्द करावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

राज्यातील सत्तासंघर्षाच्या नाट्यमय घडामोडीनंतर महाविकास आघाडीचा शपथविधी सोहळा गुरुवारी शिवाजी पार्क येथे पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 6 जणांना मंत्रिपदाची शपथ घेतली. पण मंत्र्यांनी शपथ घेताना नेत्यांची नावेघेतली हे नियमबाह्य असून हा शपथविधी रद्द करा अशी मागणी भाजपा आमदाराने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे याचिकेद्वारे केली आहे अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

आणखी वाचा - 'आम्ही फोडा फोडी केली तर भाजप रिकामी होईल!'

याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, या नव्या सरकारने नियमबाह्य काम सुरु केले आहे. शपथविधी सोहळ्यामध्ये मंत्र्यांनी शपथ घेताना आपापल्या नेत्यांची नावे घेतली हे बेकायदेशीर आहे. कायद्याप्रमाणे शपथ घेताना असे म्हणता येत नाही. त्यामुळे हा शपथविधी रद्द करा अशी याचिका करण्यात आली आहे. भाजपा आमदाराने ही याचिका केली आहे, जर राज्यपालांनी न्याय दिला नाही तर सुप्रीम कोर्टात हे प्रकरण जाईल असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

आणखी वाचा - चंद्रकांत पाटील यांचं महाविकास आघाडीला 'ओपन चॅलेंज'

त्याचसोबत जर राज्यपालांनी ही याचिका स्वीकारली तर सरकारने या 2 दिवसांत घेतलेले निर्णय रद्द होतील असेही ते म्हणाले. दरम्यान, नव्या सरकारने नियम धाब्यावर बसवले आहेत, नियमबाह्य काम करु देणार नाही, आम्ही प्रबळ विरोधी पक्ष म्हणून याचा विरोध करु, एवढचं नव्हे तर कायद्यानुसार कोणत्याही सभागृहाचा सभासद नसताना मुख्यमंत्री अथवा पंतप्रधान होता येत नाही असं सांगत येणाऱ्या काळात उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदावरुनही भाजपा आक्रमक होणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखविले. 

आणखी वाचा - भाजप भेटीपूर्वी अजित पवारांनी फेसबुक प्रोफाईल फोटो बदलला; घड्याळ काढले
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chandrakant patil criticize mahavikas aghadi oath ceremony its illegal maharashtra vidhan sabha election 2019