दिवा विझण्यापूर्वी फडफडतो; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला

संजय राऊत रोज सकाळी प्रवचन देतात अन् माध्यम ते फ्लॅश करतात - चंद्रकांत पाटील
political
politicalesakal
Summary

संजय राऊत रोज सकाळी प्रवचन देतात अन् माध्यम ते फ्लॅश करतात - चंद्रकांत पाटील

मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वातावरणात अनेक घडामोडी घडल्या आहेत. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोपप्रत्यारोप पहायला मिळत आहेत. दरम्यान, आता पुन्हा एकदा भाजप (BJP) आणि शिवसेनेतील वाद समोर आला आहे. संजय राऊतांवर (Sanjay Raut) बोलायच नाही असं आम्ही ठरवलंय. दिवा विझण्यापूर्वी फडफडतो. आपल्याला वाटत दिवा फार मोठा झाला पण तो विझण्याच्या दिशेने जात असतो अशी खोचक टीका भाजपाचे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे. आज कोल्हापुरात ते बोलत होते.

political
'अधिवेशनात ST आंदोलन अन् मराठा आरक्षणाचा विषय उचलून धरणार'

ते म्हणाले, संजय राऊतांविषयी मला काही बोलायचं नाही कारण त्यांना बोलूनच मोठं करण्यात आलं आहे. ते रोज सकाळी प्रवचन देतात. माध्यमं ते फ्लॅश करतात. त्यामुळे त्यांना काय बोलायचं ते बोलूद्या. कारण दिवा विझण्यापूर्वी फडफडत असतो. तो दिवा फार मोठा झाला असं वाटतं मात्र तो विझण्याच्या दिशेने जात असतो, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. त्यामुळे निवडणूक तिरंगी होईल की दुरंगी होईल हे माहीत नाही, असं सांगतानाच राज्यात पंढरपूर पॅटर्न राबवण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

मराठा आरक्षणासंदर्भात ते म्हणाले, संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांचं उपोषण संपल्यानंतर पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांना सरकारने दिलेल्या वेळापत्रकासाठी त्यांचा पाठपुरावा घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा सरकारकडून ती वेळापत्रक मागे पडत आहेत. आरक्षणाविषयी असलेल्या मागण्यांसंदर्भात सवालही केले आहेत. मात्र यावर काहीही उत्तर मिळालेलं नाही. त्यामुळं आता मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय पुन्हा एकदा अधिवेशनात उचलून धरणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

political
करुणा शर्मांची राजकारणात एन्ट्री; मुंडेंनाही देणार आव्हान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com