
ठाकरे सरकार हे राज्यातील समस्या आणि मुद्द्यांवर गंभीर नाही - चंद्रकांत पाटील
'अधिवेशनात ST आंदोलन अन् मराठा आरक्षणाचा विषय उचलून धरणार'
मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी लढा सुरु आहे. त्यामुळे आता मराठा आमदारांनी मराठा (Maratha Reservation) आरक्षणासाठी एकत्र यावं आणि अधिवेशनात याविषयी आवाज उठवावा, असे आवाहन भाजपाचे चंद्रकात पाटील (chandrakant patil) यांनी केलं आहे. ठाकरे सरकार हे राज्यातील समस्या आणि मुद्द्यांवर गंभीर नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. आज ते कोल्हापुरात बोलत होते.
ते म्हणाले, संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांचं उपोषण संपल्यानंतर पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांना सरकारने दिलेल्या वेळापत्रकासाठी त्यांचा पाठपुरावा घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा सरकारकडून ती वेळापत्रक मागे पडत आहेत. आरक्षणाविषयी असलेल्या मागण्यांंसंदर्भात सवालही केले आहेत. मात्र यावर काहीही उत्तर मिळालेलं नाही. त्यामुळं आता मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय पुन्हा एकदा अधिवेशनात उचलून धरणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. ते म्हणाले, कोल्हापूर उत्तरची निवडणूक जिंकायची आहे, त्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. ठाकरे सरकार (Thackeray Govt.) हे राज्यातील मुद्द्यांवर गंभीर नसल्याने सोमवारपासून एसटी आंदोलन आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलुन धरणार असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली. ते म्हणाले, गोवा, युपीची विधानसभा निवडणूक जिंकलेला तो उत्साह अजूनही कायम आहे. त्याचा पुरेपुर वापर आता या निवडणुकीच्या कार्यासाठी लावणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
पुढे पाटील म्हणाले, कोल्हापुर उत्तरच्या (Kolhapur North) निवडणुकीसंदर्भात ते म्हणाले, दिल्लीला नावं पाठवत असताना दोन नावे पाठवायची असतात. यातून कोणतं नाव पाहिजे ते कळवायंच असत. यावर दिल्लीतून निर्णय दिला जातो. त्याप्रमाणं सत्तजित कदम आणि महेश जाधव अशी दोन नावं पाठवली आहेत. यावर सत्यजित कदम यांच्या नावावर आमचा निर्णय झाला आहे. मात्र अखेरचा निर्णय हा रात्रीच्या दिल्लीतील बैठकीत होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.