राष्ट्रपती राजवट गरिबांच्या मुळावर; मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष बंद!

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

ज्या रुग्णांच्या मदतीचा फाईल अंतिम झाल्या होत्या, त्यांची संख्या 5657 इतकी मोठी आहे. यामधील अनेक रूग्ण दुर्धर आजारावर उपचार घेत आहेत. काहींच्या शस्त्रक्रिया आर्थिक चणचणीमुळे थांबल्या आहेत.

मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेचा गुंता अजूनही सुटलेला नाही. त्यामुळं राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केलीय. याचा परिणाम राज्यातील प्राशासकीय कामाकाजावर दिसू लागला असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना होणारी मदत बंद पडली आहे.

राज्यातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षच बंद झाला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे काम पुर्णत: ठप्प झाले आहे. तब्बल 5657 रूग्णांना आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागल्याने राज्यातील या कुटुंबात कमालीची अस्वस्थता आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

काही रूग्णांना तातडीची आर्थिक मदत हवी असल्याने त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. मंत्रालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून गरीब रूग्णांना अनेक आजांरावर आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे, समान्य रूग्णांना मोठा आधार मिळत होता. मात्र, राष्ट्रपती राजवटीनंतर या मदत वाटपाचे संपूर्ण काम बंद झाले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी राज्यपालांकडे हा कक्ष सुरू करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

- महाशिवआघाडीचा गुंता सुटला?; शरद पवार-सोनिया गांधी अंतिम बैठक

राज्यातील अनेक रूग्णालयात गरीब रूग्ण उपचार घेत आहेत. त्यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून मदत मिळावी यासाठी प्रक्रिया पूर्ण केली आहे. या प्रक्रियेसाठी बराच वेळ जातो. मानसिक तणाव सहन करावा लागतो. कुटुंबातील सर्वजण या रूग्णाच्या मदतीसाठी धावत असतात. पण, राष्ट्रपती राजवटीने हे सर्व सोपस्कार जागच्या जागी ठप्प झाले आहेत. मंत्रालयातील या कक्षावर कार्यालय बंद, कोणीही संपर्क साधू नये. अशी स्पष्ट सूचना चिकटवण्यात आल्याने अनेक रूग्ण रिकाम्या हाती परत जात आहेत. 

- 'जेएनयू'त पुन्हा राडा; स्वामी विवेकानंदाच्या पुतळ्याची विटंबना!

ज्या रुग्णांच्या मदतीचा फाईल अंतिम झाल्या होत्या, त्यांची संख्या 5657 इतकी मोठी आहे. यामधील अनेक रूग्ण दुर्धर आजारावर उपचार घेत आहेत. काहींच्या शस्त्रक्रिया आर्थिक चणचणीमुळे थांबल्या आहेत. तर अनेकांना तातडीची आर्थिक मदत हवी आहे. या विपरीत परिस्थीतीमधे रूग्णांचे नातेवाईक मंत्रालयातून रिकाम्या हाताने परत जात असल्याचे वेदनादायी चित्र आहे.

- 'राफेल'वरून सर्वोच्च न्यायालयाकडून मोदी सरकारला पुन्हा क्‍लीनचिट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Medical Assistance Cell has been closed due to the presidential rule