कोरोना नियम कागदावरच; आरोग्यमंत्री राजेश टोपेंभोवती गर्दीचा गराडा

कोरोना निर्बंध हे केवळ सामान्य नागरिकांसाठी आल्याचे पुन्हा दिसून आले
Rajesh Tope Corona rules
Rajesh Tope Corona rules sakal

जालना : राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा(Corona) आलेख पुन्हा वाढत आहे. त्यामुळे राज्यात निर्बंध (State restrictions) लागू केले असून जिल्हाधिकारी यांनी ही आठ पानी निर्बंधाचे आदेश काढले आहेत. मात्र, आदेश काढल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी (१०) जिल्ह्याधिकरी या आदेशाला जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यासमोर केराची टोपली दाखविण्यात आली आहे. त्याचं झालं असं की आरोग्यमंत्री राजेश टोपे(Rajesh Tope) हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय आले होते. यावेळी आरोग्यमंत्र्यांना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर तुफान गर्दी झाली. या प्रसंगी आरोग्यमंत्री राजेश टोपे ही गर्दीच्या विळख्यात हरवल्याचे पाहण्यास मिळाले. त्यामुळे कोरोना निर्बंध हे केवळ सामान्य नागरिकांसाठी आल्याचे पुन्हा दिसून आले आहे.(rajesh tope corona news)

Rajesh Tope Corona rules
दुसऱ्या डोसपासून नऊ महिने झाल्यास बूस्टर डोस

राज्यासह जालना जिल्ह्यात कोरोनाचे पुन्हा रूग्ण वाढत आहेत. त्यात रविवारी (ता.नऊ) शहरात दुबई येथून आलेल्या एकाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे. अशात कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध लागू केले आहेत. विवाह सोहळ्यास ५० तर अंत्यसंस्कारासाठी २० जणांना परवानगी दिली आहे. तर दिवसा जमाव बंदी लागू केली असून पाचपेक्षा अधिक व्यक्तीना एकत्र येण्यास मनाई आदेश दिले आहेत. एवढंच नाही तर शासकीय कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थिती कमी करण्यासह शासकीय कार्यालयात नागरिकांना लेखी परवानगीशिवाय येण्यास बंदी ही जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी निर्बंध आदेशात घातली आहे.

Rajesh Tope Corona rules
एसटी संपावर तोडगा?; पवार - कृती समितीच्या बैठकीला सुरूवात

मात्र, सोमवारी (ता.१०) जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांच्या समोर या नियमांना केराची टोपली दाखविण्यात आली. त्याचं झालं असं, आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे हे सोमवारी (ता.१०) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी आले होते. कोरोना निर्बंध आदेश असल्याने जिल्हा नियोजन समितीची बैठक ऑनलाइन घेण्यात आली. त्यानंतर होणारी पत्रकार परिषद ही कोरोना निर्बंधाचे कारण देत रद्द करण्यात आली. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. या गर्दीच्या विळख्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे ही हरवले. हा सर्व प्रकार जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांच्या समोर सुरू होता. त्यामुळे कोरोना निर्बंधातून राजकीय नेते, मंत्र्यांना सूट आहे का ? आणि केवळ सामान्य नागरिक, व्यापाऱ्यांना निर्बंध लागू आहेत का ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com