Dhananjay Munde: राष्ट्रवादीत फूट, मुंडेंना फायदा; राजकीय वजन वाढलं, अजितदादांनी मुंडेंवर सोपवली मोठी जबाबदारी

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचं राजकीय वजन वाढलंय कारण अजितदादांनी मोठी जबाबदारी मुंडेंवर सोपवली आहे. आता ही जबाबदारी नेमकी काय? मुंडेंचं राजकीय वजन कसं वाढलं तेच जाणून घेऊयात
Dhananjay Munde
Dhananjay MundeEsakal

धनंजय मुंडे सध्या राज्याचे कृषिमंत्री आहेत आणि बीड जिल्ह्यातलं एक मोठं नाव आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आश्वासक चेहरा आणि अजितदादांचे कट्टर समर्थक आहेत. म्हणजे अजितदादांनी आतापर्यंत ज्या ज्या भूमिका घेतल्या आहेत. त्या त्या भूमिकांमध्ये धनंजय मुंडेंनी वेळोवेळी मोठमोठ्या भूमिका घेत त्यांना पाठिंबा दिला आहे. पण, याच धनंजय मुंडेंचं राजकीय वजन वाढलंय कारण अजितदादांनी मोठी जबाबदारी मुंडेंवर सोपवली आहे. आता ही जबाबदारी नेमकी काय? मुंडेंचं राजकीय वजन कसं वाढलं तेच जाणून घेऊयात-

धनंजय मुंडे, राज्याचे विद्यमान कृषीमंत्री, परळीतून आमदार आहेत. स्वर्गीय भाजप नेते गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आहेत. अजितदादांचा एक विश्वासू साथीदार अन् कट्टर समर्थक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. कारण अजितदादांच्या प्रत्येक चढ-उतारात ते सावलीसारखेही उभे राहिलेत. म्हणजे अजितदादांनी जेव्हा २०१९ साली फडणवीसांसोबत पहाटेचा शपथविधी घेतला त्यावेळी शपथग्रहण सोहळ्याआधी आमदारांना एकजूट करण्याचं मोठं काम मुंडेंनी केलं होतं, असं राजकीय जाणकार सांगतात. २०१९ साली भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार सत्तेत आणण्यातही मुंडेंचीच भूमिका होती, अशीही चर्चा त्यावेळी रंगली होती. तरी, धनंजय मुंडेंची राजकीय कारकीर्दही समजून घेऊयात-

Dhananjay Munde
Manoj Jarange: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; सहकाऱ्यांच्या आग्रहाखातर घेतलं पाणी

खरंतर मुंडेंच्या राजकीय प्रवासाची सुरुवात जिल्हा परिषद सदस्य पदापासून झाली. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात सक्रीय आहेत. सुरुवातीला ते भाजपात होते. भारतीय जनता पक्षाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख म्हणून राहिलेत. त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस आणि प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर विधानपरिषदेवर निवड झाली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद सांभाळलेल्या धनंजय मुंडेंनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर सरकारला आपल्या आक्रमक भाषणांनी सळो की पळो करुनही सोडलं. त्यामुळे मुंडेंचा आक्रमक बाणा अनेकदा पाहायला मिळतो.

Dhananjay Munde
Electoral Bond: सुप्रीम कोर्टानं दिली SBIला डेडलाईन! राजकीय पक्षांना इलेक्टोरल बॉण्डद्वारे कुणी पैसा दिला? हे जाहीर करण्याचं आवाहन

पण पुढे याच धनंजय मुंडेंनी २०१२ साली भाजपाला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. मग अजितदादांचा विश्वास संपादित करत ते आज सावलीसारखे अजितदादांच्या पाठीशी उभे राहिलेले दिसतात. आणि अशाच आपल्या खास अन् कट्टर साथीदार धनंजय मुंडेंचंही आता दादांनी राजकीय वजन वाढवलंय.

Dhananjay Munde
Reliance: अंबानी टाटा प्लेमधील हिस्सा खरेदी करणार? नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉनला देणार टक्कर

कारण शिंदे-फडणवीसांच्या सत्तेत सामील होताना अजितदादा उपमुख्यमंत्री झाले तर, धनंजय मुंडे नाही त्यांनी कृषीमंत्री केलं आणि आता पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचं नाव, चिन्ह आणि पक्षाचा झेंडा मिळाल्यानंतर अजितदादांनी याच धनंजय मुंडेंवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. ती म्हणजे आगामी २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रचारप्रमुख म्हणून धनंजय मुंडेंची नियुक्ती करण्यात आली आहे. देवगिरी या अजितदादांच्या शासकीय निवासस्थानी छोटेखानी कार्यक्रमात मुंडेंच्या नियुक्तीचं पत्रही देण्यात आलं. त्यामुळे अजितदादांचा कट्टर साथीदार असणाऱ्या मुंडेंचं राजकीय वजन चांगलंच वाढलेलं दिसतंय.

Dhananjay Munde
Thane Politics: शिंदेंच्या आमदाराची आव्हाडांवर टिका; म्हणाले जितेंद्र आव्हाड नाही तर जितू उद्दीन मिया !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com