Mumbai Pune Transport : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतुकीत शिस्तीचे दर्शन

अपघात, मृत्युची संख्या घटवण्यासाठी परिवहन विभाग आणि महामार्ग पोलीसांच्या विशेष मोहिमेला यश मिळतांना दिसून येत आहे.
Mumbai Pune Expressway Transport
Mumbai Pune Expressway TransportSakal

मुंबई - वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करून बेदरकार वाहन पळवणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी आणि त्यातून होणारे अपघात, मृत्युची संख्या घटवण्यासाठी परिवहन विभाग आणि महामार्ग पोलीसांच्या विशेष मोहिमेला यश मिळतांना दिसून येत आहे. 1 डिसेंबरपासून सुरू झालेल्या मोहिमेत 7 दिवस वाहन चालकांची जनजागृती केली आहे. त्यामध्ये अतिवेगाने वाहन चालविणे, विना हेल्मेट, बिना सिटबेल्ट, लेन कटिंग, त्याशिवाय वाहन चालकांमध्ये शिस्त निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.परिणामी अवजड वाहन त्यांच्या लेन मध्येच धावत असून, चालकांच्या वेगाला मर्यादा आणण्यात सुद्धा यश आल्याने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शिस्तीत वाहतुक दिसून येत आहे.

या विशेष मोहिमेसाठी परिवहन विभागातील 30 अधिकान्यांची दोन्ही महामार्गावर नेमणूक केली असून, 24 तास ही जनजागृती अंमलबजावणी केली जात आहे. मुंबई-पुणे या दोन्ही महामार्गावरील होणारे अपघातांमध्ये अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे गंभीर अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात यापूर्वी जिवीत हानी झाली आहे. कार, जीप ही खाजगी वाहने, ट्रक, टेम्पो, ट्रेलर, टैंकर, बसेस ही परिवहन वाहने त्याचप्रमाणे जुन्या महामार्गावर मोटर सायकल चालकांचा मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यानंतर आता गुरूवार पासून भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असून, टप्याटप्याने प्रत्येक गुन्ह्यांसाठी वाहन चालकांवर कारवाई केली जाणार आहे.

वेगाने वाहन चालवल्यास रस्ता सुरक्षेचा पेपर द्यावा लागेल

खालापूर आणि उरसे या टोलनाक्यावर समुपदेशन करण्यासाठी समुपदेशन कक्षाची उभारणी केली आहे. वेगाने वाहन चालवणाऱ्या चालकांना समुपदेशन केंद्रावर अतिवेगाने वाहन चालविण्याचे दुष्परिणाम याबाबत चित्रफित दाखविण्यात येणार असून त्या चालकांना रस्ता सुरक्षा विषयीची प्रश्नावली सोडवावी लागणार आहे. त्याशिवाय वाहतुक नियमांचे पालन करण्याची शपथ घ्यावी लागणार आहे. यासाठी एक विशिष्ट सॉफ्टवेअर तयार केले असून त्याचा क्युआर कोड तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तिला स्वतः च्या मोबाइलने हा क्युआर कोड स्केन केल्यावर प्रश्नावली आणि शपथ मोबाईलवर उपलब्ध होणार असून, प्रश्नावली सोडवल्यानंतर गुणपत्रिका (प्रश्न-उत्तर) आणि शपथ घेतल्यानंतर शपथ घेतल्याचे प्रमाणपत्र लगेच उपलब्ध होणार आहे.

सिटबेल्ट बाबत जनजागृती आणि अंमलबजावणी

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ यांनी खालापुर, उरसे, रोग, सोमाटण, वरसोली येथील प्रत्येक टोलनाक्यावर आयआरबी कंपनीचे 30 कर्मचारी आणि परिवहन विभागाचे अधिकारी यांचे मार्फत टोलनाक्यावर सिटबेल्ट बाबत जनजागृती केली जात आहे. प्रत्येक वाहन चालक व त्यांच्या शेजारी बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तिने ते सिटबेल्ट लावले असल्याची खात्री केल्यानंतरच टोल प्लाझाहून त्यांना पुढे प्रवेश देण्यात येत आहे.

बेकायदेशीर प्रवासी वाहतुक

मुंबई-पुणे महामार्गावर काही खाजगी वाहने क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन सिटबेल्ट न लावता, मोबाईलचा वापर करताना अतिवेगाने वाहने चालवितात असे आढळुन आले आहे. अशा धोकादायक वाहतुक करणाऱ्या वाहनांवर पुणे, नवी मुंबई, मुंबई, मित्री चिंचवड या ठिकाणी कारवाई करण्यात येणार आहे. अशा वाहनांवर बेकायदेशीर प्रवासी वाहतूक केल्याबद्दल दंडात्मक कारवाई करून वाहन नोंदणी, अनुज्ञप्ती निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.

प्रवाशांच्या माहितीकरीता माहिती फलके

मुंबई-पुणे महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना माहितीकरीता स्थानिक वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या यांच्या मार्फत माहिती प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे दोन्ही महामार्गावर ही मोहीम सुरु असल्याबाबतचे 100 फलक लावण्यात आलेले आहेत.

ट्रान्सपोर्ट वाहनांचे अपघात घटवण्याचा प्रयत्न

बोपघाटातून मुंबईच्या दिशेने येणारा खालापूर टोल नाक्यापर्यंत रस्ता हा उताराचा असल्यामुळे खुप मोठया प्रमाणात ट्रक, टैंकर, ट्रेलर अशा मालवाहू वाहनांचा मोठ्या प्रमाणावर अपघात यापूर्वी झालेले आहेत. याठिकाणी उत्ताराचा रस्ता असूनसुध्दा इंधन वाचविण्यासाठी न्युट्रल गिअरचा वापर करून त्याठिकाणी अनेक वाहन चालक चाहन चालविताना आढळून आलेले आहेत. हा गैरसमजुत दूर करण्याच्या हेतूने त्यांच समुपदेशन करण्यासाठी आणि त्या 15 किलोमीटरच्या अंतरात एक विशेष पथकाची नेमणूक करण्यात आलेली असून वाहन चालकांना न्युट्रल गिअरचा वापर न करणे त्याचप्रमाणे वेगावर नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने पहिल्या किंवा दुसऱ्या गिअरचा वापर करण्याबाबत समुपदेशन करण्यात येत आहे. याठिकाणी वाहन चालकाचे अधिक तांत्रिक पध्दतीने प्रबोधन करण्यासाठी उत्पादक कंपन्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. यास वाहन चालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून ही जनजागृती यापुढेही सुरु राहणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com