राणे पिता-पुत्रांच्या अडचणी वाढणार? दिशा सालियानच्या कुटुंबीयांचं राष्ट्रपतींना पत्र

Disha Salian Family Lettr To President Kovind
Disha Salian Family Lettr To President Kovindesakal

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांचे सुपूत्र आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियान प्रकरणात (Disha Salian Death Case) वारंवार आरोप केले आहेत. दिशा सालियानचा बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. याप्रकरणी राणे पिता-पुत्रांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, दिशा सालियानच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Disha Salian Family Lettr To President Kovind)

Disha Salian Family Lettr To President Kovind
दिशा सालियान प्रकरणात नितेश राणेंना अटकपूर्व जामीन मंजूर

आमच्या मुलीच्या मृत्यूबद्दल राजकारण केल्याचा आरोप दिशाच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे नारायण राणे आणि नितेश राणे या दोघा पिता-पुत्रांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दिशाच्या कुटुंबीयांनी केली आहे. याबाबत त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिले आहे.

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत दिशा सालियान मृत्यूप्रकरणात गंभीर आरोप केले होते. दिशा सालियानवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप नारायण राणेंनी केला होता. तसेच या प्रकरणात सचिन वाझेचं कनेक्शन असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला होता. त्यानंतर दिशा सालियान प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं होतं. यावेळी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यानंतर दिशाच्या कुटुंबीयांनी महिला आयोगाकडे राणे पिता-पुत्रांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार दोघांवरही मालवणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी दोघांचीही तब्बल ८ तास चौकशी करण्यात आली होती.

कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर -

आठ तासांच्या चौकशीनंतरही पोलिस सोडायला तयार नव्हते. त्यानंतर अमित शाहांना फोन लावला म्हणून पोलिसांनी सोडलं, असा दावा नारायण राणेंनी केला होता. त्यांना अटक होण्याची शक्यता होती. मात्र, त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने दोन्ही पिता-पुत्रांना काही अटी आणि शर्तींवर अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. आता दिशाच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिल्यामुळे राणेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com