पायलट सुरेश कलमाडी! विमानाचे अन् पुण्याच्या राजकारणाचेही

पुण्यातील नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीमधून इंडियन एअर फोर्समध्ये १९६० मध्ये दाखल झाले होते. स्कॉड्रम लीडर म्हणून ते निवृत्त झाले होते.
Suresh Kalmadi
Suresh Kalmadi E sakal

माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचा पुण्याच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणातही एकेकाळी दबदबा होता. पुण्यात अतिशय लोकप्रिय ठरलेल्या पुणे फेस्टिवलचं ते 32 वर्षांपासून ते आयोजन करत आहेत. पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना यंदाच्या पुणे फेस्टीवलचं निमंत्रण देण्यासाठी ते महापालिकेत आले होते. तब्बल दहा वर्षांनंतर ते महापालिकेत आले होते.

१९९८ ची राज्यसभा निवडणूक भारतात खूप गाजली होती. कॉंग्रेसच्या मातब्बर उमेदवार राम प्रधानांचा पराभव करुन ते निवडून आले होते. १९९८ च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार माजी केंद्रीय सचिव राम प्रधान सहजरित्या निवडून येतील अशी परिस्थिती असताना अपक्ष म्हणून उभ्या असलेल्या सुरेश कलमाडींचा विजय झाले. अपक्ष असलेले सुरेश कलमाडी निवडून आल्याने तत्कालीन कॉग्रेस पक्षाध्यक्षांनी कॉग्रेस आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई केली होती. तर याच निवडणुकीनंतर शरद पवार कॉंग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली.

सुरेश कलमाडींनी १९६५ साली पाकिस्तान आणि १९७१ च्या बांग्लादेशच्या म्हणजे तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानाविरुद्धच्या युद्धात भारतीय वायूसेनेचे पायलट म्हणून कर्तव्य बजावलं होतं. पुण्यातील NDA (नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी) मधून इंडियन एअर फोर्समध्ये १९६० मध्ये दाखल झाले होते. स्कॉड्रन लीडर म्हणून ते निवृत्त झाले होते.

Suresh Kalmadi
Suresh Kalmadi: 'मी पुन्हा येईन'; म्हणत १० वर्षांनी 'पुण्याचे कारभारी' महापालिकेत

१९७४ मध्ये त्यांनी लवकर निवृत्ती घेतली. त्यांनी महाराष्ट्र युवा कॉंग्रेसची धुरा सांभाळली होती. तसंच ते संजय गांधीचे निकवर्तीय मानले जातं. १९८२ साली ते राज्यसभा खासदार झाले. भारतीय खेळांना आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यसाठी केलेले प्रयत्नांची वाहवा झाली. मात्र पुढे भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे भारतीय ऑलंपिक असोसिएशनचं पद सोडावं लागलं होतं. त्यानंतर ते राजकारणापासून लांब राहिले.

पुणे फेस्टीवलनिमित्त मात्र ते आजही समाजकारणात अॅक्टीव्ह आहेत. सुरेश कलमाडी महानगरपालिकेत येताच कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com