ssc and hsc result
ssc and hsc resultesakal

दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर; शिक्षण मंत्र्यांची घोषणा

जाणून घ्या सविस्तर टाईमटेबल

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं पुढील वर्षी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या (SSC, HSC exams)बोर्डाच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. त्यानुसार, बारावीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ दरम्यान होणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल दरम्यान होईल. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी गुरुवारी याची घोषणा केली.

विद्यार्थ्यांना आणि पालकांना माहिती देताना गायकवाड म्हणाल्या, "सर्व संबंधित घटकांशी, शिक्षण तज्ज्ञांशी विचारविनिमय केल्यानंतर उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) व माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक आम्ही जाहीर करत आहोत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळं उर्वरित अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नच परीक्षेत विचारले जातील.

दहावी-बारावी परीक्षा दरवर्षीप्रमाणेच

दहावीच्या परीक्षांचं वेळापत्रक असं असेल -

दहावीच्या लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ याकालावधीत प्रचलित पद्धतीने (ऑफलाईन) होतील. तसेच प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांची परीक्षा (प्रचलित पद्धतीनुसार) २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ याकालावधीत पार पडेल. दहावीचा निकाल जुलै २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचा प्रयत्न असेल. कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोर पालन करूनच सर्व परीक्षा पार पडतील.

बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक असं असेल -

बारावीच्या लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ दरम्यान होतील. बारावीसाठी अनुक्रमे १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ या कालावधीत प्रचलित पद्धतीनं परीक्षा होतील. १२ वीचा निकाल जून २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

SSC, HSC exam
SSC, HSC exam

दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणमंडळ परीक्षांचे तपशीलवार वेळापत्रक जाहीर करेल, असंही शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता आमची प्राथमिकता आहे. सुरक्षित व पोषक वातावरण प्रदान करण्यासाठी याअगोदर परीक्षा वेळापत्रक, पद्धतीबद्दल राज्यभरातील शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व मूल्यांकनासंदर्भातील तज्ज्ञांसोबत विस्तृत चर्चा करून त्यांच्या मौल्यवान सूचनांचा समावेश करण्यात आला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com