माझ्यात ठाकरे सरकारच्या ठोकशाहीला ठोकण्याची नशा; सोमय्या आक्रमक

किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परीषद घेत सरकारवर ताशेरे ओढले
 Kirit Somaiya
Kirit Somaiyaटिम ई सकाळ

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज पत्रकार परीषद घेत सरकारवर ताशेरे ओढले. माझ्यात ठाकरे सरकारच्या ठोकशाहीला ठोकण्याची नशा आहे, असे सोमय्या म्हणाले.

“मी आयुष्यात कधी विडी, सिगारेट बिअरही प्यायलो नाही. अंडही खाल्लं नाही पण माझ्यात ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) ठोकशाहीला ठोकण्याची नशा आहे. माझ्यात उद्धव ठाकरेंच्या माफियागीरीला संपवण्याची नशा आहे. महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला लुटणाऱ्या आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याकडून पैसे आणण्याची माझ्यात नशा आहे” असे सोमय्या म्हणाले.

 Kirit Somaiya
Karnataka : हिजाब वादात आता पाकिस्तानच्या मलालाची उडी

जम्बो कोवीड रुग्णालयाच्या कामात भ्रष्टाचारासंदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी पुणे महापालिका येथे (Pune Municipal Corporation) आलेले भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांना दुखापत झाली होती. या घटनेवरून ते शिवसेनेवर (Shivsena)आक्रमक झाल्याचे दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com