काॅपीमुक्त कोकण; १२वी, १०वीच्या परीक्षेत शून्य गैरप्रकार

Konkan Zero misconduct in 10th, 12th examination
Konkan Zero misconduct in 10th, 12th examination

पुणे : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता १२वी व १०वीच्या परीक्षेत महाराष्ट्रात ९२६ काॅपीबहाद्दरांवर कारवाई करण्यात आली. मात्र, यामध्ये कोकण विभागातील एकाही विद्यार्थाचा समावेश नसल्याने काॅपीमुक्तीतचा आदर्श येथील विद्यार्थांनी घालून दिला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
राज्यात १२वी, १०वीची परीक्षा घेतली जात असताना परीक्षेत सामुहीक, वैयक्तीक काॅपी होऊ नये, प्रश्नपत्रिका फूटू नये यासाठी परीक्षा मंडळाला सतर्क रहावे लागते. परीक्षेच्या आधी काॅपीमुक्त अभियानाअंतर्गत शाळांमध्ये जाऊन विद्यार्थांमध्ये जनजागृती, पालकांच्या बैठकी आयोजित करून विद्यार्थांचे समुपदेशन करण्याच्या सूचना दिल्या जातात. प्रत्यक्ष परीक्षा सुरू झाल्यानंतर भरारी पथकांची नियुक्ती करून काॅपी सेंटरवर अचानक कारवाई केली जाते. यंदा १२वी आणि १०वी साठी संपूर्ण राज्यात प्रत्येकी २७३ भरारी पथके नेमली होती. 

जगातील पहिली घटना; अमेरिकेत कोरोनामुळे लहान बाळाचा मृत्यू

शिक्षण मंडळाकडून कडक नियम केले जाते असले तरी दरवर्षी काॅपी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यंदाच्या १२वीच्या परीक्षेत राज्यात ६५८ जणांवर कारवाई केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक काॅपीबहाद्दर औरंगाबाद विभागामध्ये १३७,  लातूर १२२, नागपूर १०५, नाशिक व पुणे प्रत्येकी ९६, अमरावती ५६, कोल्हापूर ३५, मुंबई विभागात १० जणांवर कारवाई केली आहे. तर कोकण विभागात एकही विद्यार्थी काॅपी करताना आढळलेला नाही. 

जगभरातील मृतांची संख्या वाढली; युरोपमध्ये सर्वाधिक 21 हजार मृत्यू
 
१२वीच्या तुलनेत १०वीला काॅपी करण्याचे प्रमाण बर्यापैकी  घटले आहे, राज्यभरात २६८ जणांवर कारवाई केली. यात औरंगाबाद विभागात ५७, नागपूर ५१, अमरावती ३७, कोल्हापूर व नाशिक प्रत्येकी ३३, लातूर ३२, पुणे २४, मुंबई १ आणि कोकण विभागात शून्य काॅपी प्रकार घडले अाहेत. १०वीचा भूगोलाचा पेपर अद्याप शिल्लक असल्याने यामध्ये काही प्रमाणात वाढ होऊ शकते. 

महाराष्ट्रापुढे आव्हान : कोरोना रुग्णांवर उपचार करायचे तरी कसे?

कोकण विभागाची गेल्या काही वर्षांपासून १२वी, १०वीचा निकालात कामगिरी उत्तम असून राज्यात विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण याच विभागाचे सर्वाधिक आहे. विद्यार्थांची गुणवत्ता वाढत असताना, काॅपीमुक्तीकडे जाण्यासाठी शिक्षक, पालक यांच्याकडून होणारी जडणघडण महत्वाची आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी काॅपी करणे टाळतात. 

coronavirus: पुणे पोलिसांकडून 3665 जणांना "क्‍युआर कोड" 

"कोकण विभागात तीन वर्ष काम केले आहे, तेथे विद्यार्थी काॅपी करताना निदर्शनास आलेले नाही. मुलांनी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी, चांगले गुण मिळविण्यासाठी काॅपी करू नये, प्रामाणिकपणे उत्तरपत्रिका लिहावी यासाठी पालक, शिक्षक यांची भूमिका महत्वाची ठरते. ते कायम विद्यार्थांना हे प्रकार टाळण्यासाठी जनजागृती करतात. त्यामुळे या विभागात काॅपीचा  एकही प्रकार सापडलेला नाही. इतर विभागांमध्ये अशा प्रकारची मानसिकता घडणे महत्त्वाचे आहे."
- शकुंतला काळे, अध्यक्ष, राज्य शिक्षण मंडळ. 

- Coronavirus : 'हे' आहेत जगातील 'टॉप १०' खतरनाक व्हायरस!

विभाग             १२वी, १०वी परीक्षेतील काॅपी कारवाई
पुणे                           १२०
नागपूर                      १५६
औरंगाबाद                 १९४
मुंबई                          ११
कोल्हापूर                    ६९
अमरावती                   ९३
नाशिक                      १२९
लातूर                         १५४
कोकण                       ०००
एकुण                         ९२६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com