

कुर्ला आंबेडकर नगर येथे बेस्ट बसचा मोठा अपघात झाला. यावेळी बसने कुर्ला एल वॉर्ड येथून अनेक गाड्यांना ठोकर दिली. यात ५ जणांचा अपघात झाला आहे. तर जखमी ३१ जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत
कुर्ला येथील आंबेडकर नगर परिसरातून 332 क्रमांकची बस कुर्ला वरून अंधेरी कडे निघाली होती. याचवेळीत हा अपघात झाला. या अपघातात जवळपास दहा ते पंधरा गाड्यांना बेस्ट बसने ठोकर दिलेली आहे. जेव्हा हा अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बस मध्ये तब्बल ६० प्रवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.