‘मैत्रीण’ स्पर्धेचा निकाल जाहीर; आठ जणींना ई-बाईक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सकाळ कार्यालय - मैत्रीण स्पर्धेचा निकाल सोडतीद्वारे जाहीर करताना (डावीकडून) महाराष्ट्रकेसरी पैलवान राहुल काळभोर, चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बांदल आणि महेश नागरी पतसंस्थेचे सचिव-संचालक मगराज राठी.

‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’तर्फे महिलांसाठी घेण्यात आलेल्या ‘मैत्रीण’ या अभिनव स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात असून, विजेत्या ठरलेल्या महिलांना आठ स्कूटी ई-बाईक, २५ सोन्याच्या ठुशी बक्षीस मिळाले आहेत. याशिवाय २०० पैठणी, ५०० चांदीचे नाणे, एक हजार गृहोपयोगी वस्तू, किमान ५० प्रश्‍नांची उत्तरे योग्य दिलेल्या विजेत्यांना हमखास बक्षीसही दिली जाणार आहेत.

‘मैत्रीण’ स्पर्धेचा निकाल जाहीर; आठ जणींना ई-बाईक

पुणे - ‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’तर्फे महिलांसाठी घेण्यात आलेल्या ‘मैत्रीण’ या अभिनव स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात असून, विजेत्या ठरलेल्या महिलांना आठ स्कूटी ई-बाईक, २५ सोन्याच्या ठुशी बक्षीस मिळाले आहेत. याशिवाय २०० पैठणी, ५०० चांदीचे नाणे, एक हजार गृहोपयोगी वस्तू, किमान ५० प्रश्‍नांची उत्तरे योग्य दिलेल्या विजेत्यांना हमखास बक्षीसही दिली जाणार आहेत. पुणे जिल्ह्यातील प्रणिता नितीन सातव (बारामती) व सुशीला शरद माप्राळकर (आंबेगाव बुद्रुक) यांच्यासह राज्यातील आठ जणींना ई-बाईकचे बक्षीस जाहीर झाले आहे. जिल्ह्यातील विद्या दिलीप जाधव (सासवड), अर्चना शरद जमदाडे (पिंपरी चिंचवड), रेखा उत्तम दवे (नारायण पेठ, पुणे) यांच्यासह राज्यातील २५ जणींना  सोन्याच्या ठुशीचे बक्षीस जाहीर झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अशी हजारो बक्षिसे वितरित करण्यात येणार असून, यासाठी विजेत्यांना फोनद्वारे संपर्क करण्यात येईल. दरम्यान, कोरोना संसर्गामुळे एकत्रित बक्षिसे वाटपाचा कार्यक्रम कार्यालयात होणार नाही. मात्र, बक्षिसे वाटपाबाबत ‘सकाळ’मधून लवकरच कळविण्यात येणार आहे.

पुण्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत चालल्याने कोरोना उपचार केंद्र पुन्हा होणार सुरू

‘सकाळ व अॅग्रोवन’तर्फे महिला वाचकांसाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांना सर्व स्तरातील महिलांकडून नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. याअंतर्गत ५ नोव्हेंबर २०२० ते १५ जानेवारी २०२१ या कालावधीत सर्व वयोगटातील महिलांसाठी ‘सकाळ मैत्रीण’ ही खास अभिनव स्पर्धा सुरू करण्यात आली होती. एकूण ७२ दिवसांच्या कालावधीत (रविवार वगळता) ‘सकाळ’ व ‘अॅग्रोवन’ अंकात ‘मैत्रीण’ हे खास सदर प्रसिद्ध करण्यात आले होते. या सदरात दागिने, त्वचा व केसांचे सौंदर्य, फॅशन, किचन गॅजेट्स, आरोग्य संवाद, योग, रेसिपीज अशा महिलांसंबंधीच्या विषयांबाबत लेख व सदरांचा समावेश होता. यातील मजकुरावर आधारित प्रश्नाचे कूपन दररोज प्रकाशित करून प्रश्‍न विचारण्यात आले होते. रविवार वगळता विचारलेल्या ६० प्रश्नांमधून किमान ५० प्रश्‍नांची उत्तरे महिलांनी कुपनवर चिकटवून ‘सकाळ’ कार्यालयात पाठवायचे होते. ही स्पर्धा ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने राबविण्यात आली होती. या स्पर्धेला राज्यभरातून महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

परीक्षा लांबणीवरच पडत असल्याने विद्यार्थी, प्राध्यापकांमध्ये अस्वस्थता वाढली

ई-बाईक विजेत्या
प्रणिता नितीन सातव (बारामती, पुणे), सुशीला शरद माप्राळकर (आंबेगाव बुद्रुक, पुणे), सिंधुताई गणपत खेडकर (शिरुर कासार, बीड), मंगला जालिंदर गावडे (येवला, नाशिक), हर्षा मनीष पाटील (नागपूर), रजनी राजाराम पाटील (कल्याण), स्वाती रघुनाथ वराडकर (टाकाळा, कोल्हापूर), माया अनेय कामत (म्हापसा, गोवा)

पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणी : सत्य लपवण्यासाठी भाजपच्या नगरसेवकावर दबाव : जगदीश मुळीक

सोन्याची ठुशी विजेत्या
विद्या दिलीप जाधव (सासवड, पुणे), अर्चना शरद जमदाडे (पिंपरी चिंचवड), रेखा उत्तम दवे (नारायण पेठ, पुणे), काजल सचिन तायड (औरंगाबाद), कालिंदा मारुती चव्हाण (धार, परभणी), रेखा मार्कंडे (लातूर), संगीता राजेंद्र आळसेट (अकोला), ज्योती लक्ष्मीकांत चिंचणे (सातपुर, नाशिक), अर्चना राहुल शर्मा (मालेगाव, नाशिक), सीमा काशीनाथ सोमवंशी (धुळे), कुसुम रामदास बावीस्कर (जळगाव), शर्मिला नारायण जाधव (वाई, सातारा), माधुरी सुयोग शिंदे (सातारा), नीशा घनश्‍याम रायकवार (अमरावती), सीमा प्रकाश कांबळे (वर्धा), कांचन किशोर चौधरी (वाडा, पालघर), छाया प्रकाश पाटील (परळ, मुंबई), निर्मला नागेश लंकेश्‍वर (सोलापूर), भाग्यश्री दीपक कुलकर्णी (पंढरपूर, सोलापूर), नीता दीपक शिंदे (करवीर, कोल्हापूर), सुजाता संदीप पोतदार (हातकंणगले, कोल्हापूर), विजया राजाराम कुंभार (पलूस, सांगली), पल्लवी सॅम्युअल बोर्डे (नगर), अर्चना अर्जुन शेळके (संगमनेर), भारती ब. नाईक (केपे, गोवा)

Edited By - Prashant Patil

Web Title: Maitrin Competition Result Declare

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top