गुड इव्हनिंग! दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

Good Evening
Good Evening
Updated on

भाजप नेते अरुण जेटली यांची प्रकृती स्थिर... साहेब, तुमच्या रुपात मला साक्षात शिवराय दिसले!... एक नंबर! पेट्रोलवर नव्हे तर खाण्याच्या तेलावर चालणार कार... ही अभिनेत्री साकारणार सुषमा स्वराज!... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

- भाजप नेते अरुण जेटली यांची प्रकृती स्थिर

'एम्स' अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री तसेच संरक्षणमंत्री अरूण जेटली यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांनी आज एम्स गाठले.

- पुरस्थितीत सरकार, नागरिक आणि माध्यमांनी कसे वागावे, मग हे वाचाच!

आपत्तीच्या काळात सर्वात मोठा अडथळा निर्माण होतो, तो म्हणजे अफवांचा! अफवांचे पेव फुटून आपत्तीच्या काळात नागरिकांमध्ये घबराट, अस्वस्थता आणि चिंतेचे वातावरण पसरू शकते.

- साहेब, तुमच्या रुपात मला साक्षात शिवराय दिसले!

खरंच राजं आहात तुम्ही साहेब! आजवर तुम्हाला फक्त टीव्हीवर शिवाजी, संभाजी महाराजांची भूमिका करताना पाहिलं होतं, पण आज तुम्ही आमच्यासाठी इथं आला, तुमच्या रुपात आम्हाला साक्षात शिवरायांचं दर्शन झालं.

- मुख्यमंत्री गरिबांना भेटलेच नाहीत; उच्चभ्रू पूरग्रस्तांची विचारपूस (व्हिडिओ)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कच्छी जैन भवनमध्ये पूरग्रस्तांची भेट घेऊन विचारपूस केली, मात्र त्यांची ही भेट आता वादात सापडली आहे.

- एक नंबर! पेट्रोलवर नव्हे तर खाण्याच्या तेलावर चालणार कार

कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या धोरणाचा भाग म्हणून खाद्यतेलाचे रुपांतर जैविक इंधनात करण्यासंदर्भात संशोधन सुरू आहे.

- INDvsWI : 6.8 फूट उंच अन् 150 किलोचा पैलवान भिडणार भारतीयांना

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेत विंडीजच्या संघात चक्क 6.8 उंच आणि 150 किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या खेळाडूला स्थान देण्यात आले आहे. 

- ही अभिनेत्री साकारणार सुषमा स्वराज!

संधी मिळाल्यास सुषमा स्वराज यांच्यावरील चरित्रपटामध्ये (बायोपिक) प्रमुख भूमिका साकारायला काम करायला मला आवडेल, असे मत एका अभिनेत्रीने व्यक्त केले आहे. कोण आहे ही अभिनेत्री?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com