एप्रिल महिन्यात उन्हाचे चटके अधिक भासणार; हवामान विभागाचा अंदाज

राज्यातील किमान आणि कमाल तापमान हे सरासरीपेक्षा जास्त राहिल, असे देखील सांगितले आहे.
Temperature
Temperature Sakal
Updated on

मुंबई : दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या उन्हाच्या (Heat Wave ) तीव्रतेने अंगाची लाही लाही होत असल्याने नागरिक हैराण झाले आहे. त्यात एप्रिल महिन्यात उन्हाळा (Summer) अधिक तीव्र असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील किमान आणि कमाल तापमान हे सरासरीपेक्षा जास्त राहिल, असे देखील हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र येथे यंदा पाउसही जास्त राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Maharashtra Summer Forecast )

Temperature
Kashmir Files ला दुबईत 'ग्रीन' सिग्नल; एकही दृष्य न वगळता 'स्क्रिनिंग'

राज्यातल्या कमाल आणि किमान तापमानात वाढ पाहण्यास मिळू शकते असा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे. याशिवाय यंदा कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊसही सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

एप्रिल महिन्यात तापमानात (Temperature) वाढ पाहण्यास मिळेल. तसेच कमाल आणि किमान तापमानात सरासरीपेक्षा जास्त असेल असादेखील अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामध्ये प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, तसेच मराठवाड्याती काही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद केली जाऊ शकते. (Summer In Maharashtra)

Temperature
वन्नियार समाजाचे 10.5 टक्के आरक्षण रद्द, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

मागील वर्षांपेक्षा अधिक तापमान यावर्षीच्या एप्रिल महिन्यामध्ये राज्यातील काही भागांमध्ये बघायला मिळू शकेल. तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रात यंदा पाऊस (Rain) अधिक असण्याबरोबरच सरासरीपेक्षा याचे प्रमाण अधिक असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून, आगामी मॉन्सूनदेखील चांगला असले असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur rural police
jewellery theft
YCMOU nashik
Maharashtra Latest Marathi News Live Update
Marathi News Esakal
www.esakal.com