‘म्हाडा’ची प्रक्रिया पारदर्शक; भूलथापांना बळी पडू नका - उपमुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 January 2021

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) माध्यमातून सर्वसामान्यांना माफक दरात हक्कांची घरे मिळवून देण्याचे काम सुरु आहे. 'म्हाडा’ची प्रक्रिया पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त असून, यासाठी दलालाची नेमणूक केलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी भूलथापांना बळी पडू नये.

पाच हजार ६४७ सदनिकांसाठी ऑनलाइन सोडत 
पुणे - पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) माध्यमातून सर्वसामान्यांना माफक दरात हक्कांची घरे मिळवून देण्याचे काम सुरु आहे. 'म्हाडा’ची प्रक्रिया पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त असून, यासाठी दलालाची नेमणूक केलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी भूलथापांना बळी पडू नये. घर मिळवून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या दलालांविरुद्ध पोलिस ठाणे किंवा म्हाडा कार्यालयात तक्रार करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत म्हाडाच्या पुणे विभागातील पुणे, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली येथील पाच हजार ६४७ सदनिकांसाठी शुक्रवारी ऑनलाइन सोडत काढण्यात आली. नेहरू मेमोरिअल सभागृहात आयोजित कार्यक्रमास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, उपमहापौर सरस्वती शेंडगे आदी या वेळी उपस्थित होते. 

सीरममधील आगीसंदर्भात आलं महत्त्वाचं अपडेट; तपास पथकानं दिली माहिती

पवार म्हणाले, स्वत:चे शहरात घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु महागाई, घरांच्या वाढलेल्या किमतीमुळे नागरिकांचे घर घेण्याचे स्वप्न अपूर्ण राहते. सर्वसामान्यांना माफक दरात हक्कांची घरे मिळवून देण्याचे काम सुरु आहे. ‘म्हाडा’ची घरे बांधताना घरात हवा खेळती राहील, वाहनांसाठी पार्किंग, क्रीडांगणासाठी आरक्षित जागा ठेवावी. 

पुण्यात शाळेची घंटा वाजणार; पालकांची लेखी मंजुरी अत्यावश्यक

‘म्हाडा’च्या पाच हजार ६४७ सदनिकांसाठी एकूण एक लाख ९ हजार ४३८ जणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९२ हजार ३३७ जणांनी रकमेसह अर्ज भरले होते, असे पुणे मंडळाचे मुख्याधिकारी नितीन माने यांनी सांगितले. तर, आभार मिळकत उपअभियंता संजय नाईक यांनी मानले. 

कोणाच्या चेहऱ्यावर आनंद तर... 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'म्हाडा’च्या वतीने सदनिकांच्या ऑनलाइन सोडतीसाठी यूट्यूबवरून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. म्हाडाच्या वतीने लॉटरी लागलेल्या लाभार्थ्यांना कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काही बॅंकांनी स्टॉलही लावले होते. म्हाडाच्या सोडतीनंतर बाहेर लावण्यात आलेल्या यादीत आपले नाव आहे की नाही, हे पाहण्यासाठी इच्छुकांनी गर्दी केली होती. यादीत नाव आल्याचे पाहून कोणाच्या 
चेहऱ्यावर आनंद तर नाव न दिसल्यामुळे कोणाच्या चेहऱ्यावर नाराजीही दिसून येत होती. 

बंगालच्या मातीचं होतंय सोनं; पुण्यात फसवणुकीचा अजब प्रकार उघडकीस

फर्स्ट कम फस्ट सर्व्ह 
म्हाडाच्या फर्स्ट कम फस्ट सर्व्ह योजनेत एक हजार आठशे सदनिकांसाठी दुप्पट अर्ज आले आहेत. संबंधित लाभार्थ्यांना इ-मेल आणि एसएमएस पाठविण्यात आहेत. जे लाभार्थी दहा टक़के रककम बॅंक खात्यात भरतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच, सोडतीची संपूर्ण यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे असे ‘म्हाडा’च्या पुणे मंडळाचे मुख्याधिकारी नितीन माने यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mhada Process Transparent Ajit Pawar