रेड्यानं ज्ञानेश्वरी म्हटली तसं नारायण राणे सत्य बोलले; बच्चू कडूंचा 'प्रहार'

Bachchu Kadu vs Narayan Rane
Bachchu Kadu vs Narayan Rane esakal
Summary

सध्या राज्यात भोंगे, हनुमान चालिसा यावरुन वाद सुरुय.

अकोला : सध्या राज्यात भोंगे, हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) यावरुन वाद सुरुय. त्यामुळं राज्यात भीषण परिस्थिती निर्माण झालीय. याच पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडूंनी (Bacchu Kadu) राजकीय नेत्यांना फटकारलंय. कोरोना काळात (Coronavirus) तब्बल दोन वर्षे आम्ही हॉस्पिटल्ससमोर पाय घासत होतो अन् आता परिस्थिती सुधारायला लागताच आम्ही ते विसरलोय. आता खुर्चीसाठी राजकारण, एवढंच काय ते आम्हाला माहिती आहे, अशा शब्दांत बच्चू कडूंनी राजकीय नेत्यांवर निशाणा साधलाय.

अकोल्यात (Akola) माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, राजकारण्यांना जनतेच्या वेदनांशी काहीही देणं-घेणं राहिलेलं नाहीय. केवळ खुर्चीसाठी राजकारण करणं आम्हाला माहीत आहे. कोरोना काळात दोन वर्षे आम्ही हॉस्पिटलसमोर बेडसाठी ऑक्सिजनसाठी पाय घासत होतो आणि आज ते सर्व विसरलोय. आम्ही एवढे अपरिपक्व आहोत, अयशस्वी आहोत की आमच्या डोक्यात भोंगा आला, हनुमान चालिसा आलीय. हे आजच्या राजकारणाचं (Politics) सर्वात मोठं अपयश आहे, असं सांगत त्यांनी राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीवर भाष्य केलंय.

Bachchu Kadu vs Narayan Rane
बृजभूषणांनंतर राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर काय म्हणाले गोविंददेव महाराज?

ते पुढं म्हणाले, ओवैसी आला अन् औरंगजेबाच्या (Aurangzeb) समाधीचं दर्शन घेतलं. भाजपनं चालिसा म्हटली तर राज ठाकरे यांनी भोंगे मध्येच आणले. कोरोना पुन्हा येऊच नये, मात्र पुन्हा तशी परिस्थिती उद्भवली तर दवाखान्यांचं काय, यासाठी कुणी समोर येताना दिसत नाहीय. पण, आमची प्रहार संघटना आणि मराठा सेवा संघ मिळून हॉस्पिटल दत्तक घेण्याचे प्रयत्न करीत आहोत. हे बघून तरी कुणाला सुबुद्धी यावी, असं ते म्हणाले. दरम्यान, नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर विचारलेल्या प्रश्नांवर रेड्यानं ज्ञानेश्वरी म्हटली तसं नारायण राणे सत्य बोलले. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) बरोबरी करूच शकत नाहीत, असं स्पष्ट मतही बच्चू कडूंनी व्यक्त केलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com