'राजेंचा' केवळ राजकीय वापर?

Union Cabinet Expansion 2021
Union Cabinet Expansion 2021esakal

सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटचा विस्तार (Union Cabinet Expansion 2021) झाला असून, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलीय. मंत्रिमंडळाच्या विस्तारात काल सायंकाळी 43 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातून खासदार नारायण राणे (MP Narayan Rane) यांना कॅबिनेटमंत्री तर खासदार कपिल पाटील (MP Kapil Patil), खासदार डॉ. भारती पवार (MP Dr. Bharti Pawar) आणि खासदार डॉ. भागवत कराड (MP Dr. Bhagwat Karad) यांना राज्यमंत्री पदाची शपथ दिली. खातेवाटपात नारायण राणे यांना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय देण्यात आले आहे. दरम्यान, एकीकडे महाराष्ट्राचे ४ नेते केंद्रात गेलेले असताना, दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीची खासदारकी सोडून भाजपात प्रवेश करणाऱ्या उदयनराजेंना (MP Udayanraje Bhosale) मात्र केंद्रीय मंत्रिमंडळात संधी न देता डावलण्यात आलंय. तसेच खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनाही या मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने नाराजीचा सूर उमटू लागला आहे. काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाबाबत खासदार संभाजीराजेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Prime Minister Narendra Modi) दोनवेळा पत्र लिहिली; पण या दोन्ही पत्रांना मोदींनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे मोदी सरकार राजेंचा केवळ राजकीय वापर तर करत नाही ना? शंका उपस्थित होऊ लागलीय. (Modi Government MP Udayanraje Bhosale and MP Sambhajiraje Chhatrapati Are Not Included In The Union Cabinet Expansion 2021)

Summary

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटचा विस्तार झाला असून, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलीय.

गेल्या काही दिवसांपासून खासदार उदयनराजे भोसले यांना केंद्रात संधी मिळणार, अशी चर्चा सुरु असतानाच काल मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचे कुठेही नाव न आल्याने कार्यकर्त्यांत नाराजी पसरलीय. साताऱ्यातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर मिळवलेल्या खासदारकीचा राजीनामा देत उदयनराजे भोसले यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला होता. खासदार उदयनराजेंना भाजपने मोठ्या प्रयत्नाने भाजपमध्ये समाविष्ट करून साताऱ्यात आपली ताकत वाढवली. अमित शहांच्या उपस्थितीमध्ये उदयनराजे भाजपवासी झाले. त्यानंतर निवडणूक आयोगाने (Election Commission) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसोबतच साताऱ्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीचीही (Satara Loksabha) घोषणा केली होती. लोकसभेची पोट निवडणूक पुन्हा लागल्यानंतर साताऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सुद्धा घेण्यात आली. मात्र, उदयनराजे यांनी घेतलेल्या पक्ष बदलाच्या निर्णयाला सातारच्या जनतेने नाकारल्याने उदयनराजेंचा मोठ्या मतांच्या फरकाने पराभव झाला. या पराभवानंतर देखील त्यांची समजूत काढण्यासाठी त्यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली. मात्र, उदयनराजेंना मंत्रीपद मिळेल अशी शक्यता असतानाच, त्यांना डावलण्यात आल्याने कार्यकर्त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

Union Cabinet Expansion 2021
'..तर मराठा समाज सरकारविरोधात पेटून उठल्याशिवाय राहणार नाही'

खासदार उदयनराजेंना पुढे भविष्यात केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलं जाईल, अशी आशा त्यांच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांना होती आणि अशा चर्चाही जोरदार रंगल्या होत्या. मात्र, आता (७ जुलै) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या यादीत उदयनराजे भोसले यांना कुठंही स्थान देण्यात आले नसल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. तसेच खासदार संभाजीराजे छत्रपती यांना देखील डावल्याने मोदी सरकारविरोधात संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे मोदी सरकार केवळ निवडणुकी पुरतेच राजेंचा वापर करते का?, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Union Cabinet Expansion 2021
रणजितसिंहांना मंत्रिमंडळात संधी द्या

या ४३ नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश : नारायण राणे, सर्बानंद सोनोवाल, डॉ. विरेंद्र कुमार, ज्योतिरादित्य सिंधिया, रामचंद्र प्रसाद सिंग, अश्विनी वैष्णव, पशुपती कुमार पारस, किरेन रिजीजू, राजकुमार सिंह, हरदीपसिंह पुरी, मनसुख मंडाविया, भुपेन्द्र यादव, पुरुषोत्तम रुपाला, जी. किशन रेड्डी, अनुरागसिंह ठाकूर, अनुप्रियासिंह पटेल, डॉ. सत्यपालसिंह बघेल, राजीव चंद्रशेखर, शोभा करंडलाजे, भानूप्रतापसिंग वर्मा, दर्शना विक्रम जरदोष, मीनाक्षी लेखी, अनपुर्णा देवी, ए. नारायण स्वामी, कौशल किशोर, अजय भट्ट, बी. एल. वर्मा, अजय कुमार, चौहान देवूसिंह, भागवत खुपा, कपिल पाटील, प्रतिमा भौमिक, डॉ. सुभाष सरकार, डॉ. भागवत कराड, डॉ. राजकुमार सिंह, डॉ. भारती पवार, बिस्वेश्वर तडू, शंतनू ठाकूर, डॉ. मुंजपारा महेंद्रभाई, जॉन बरला, डॉ. एल. मुरगन, निसित प्रमाणिक यांचा समावेश आहे.

Union Cabinet Expansion 2021
धक्कादायक! लसीकरण मोहिमेत 'घोटाळा', अनेकांकडून पदाचा गैरवापर

महाराष्ट्रातून एक कॅबिनेट व तीन राज्यमंत्री : राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातून खासदार नारायण राणे यांना कॅबिनेटमंत्री तर खासदार कपील पाटील, खासदार डॉ. भारती पवार आणि खासदार डॉ. भागवत कराड यांना राज्यमंत्री पदाची शपथ दिली. खातेवाटपात नारायण राणे यांना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय देण्यात आले आहे.

Union Cabinet Expansion 2021
कोरोना नियमांचे उल्लंघन; संभाजी भिडेंसह ८० जणांवर गुन्हा

'या' 7 महिलांनी घेतली केंद्रीय मंत्रीपदाची शपथ

  1. अनुप्रिया सिंह पटेल (उत्तर प्रदेश)

  2. शोभा करंदलाजे (कर्नाटक)

  3. दर्शना विक्रम जरदोष (गुजरात)

  4. मीनाक्षी लेखी (नवी दिल्ली)

  5. अन्नपूर्णा देवी (मध्य प्रदेश)

  6. प्रतिमा भौमिक (त्रिपुरा)

  7. डॉ. भारती प्रवीण पवार (महाराष्ट्र)

राजीनामा दिलेले मंत्री : रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, थावरचंद गेहलोत, रमेश पोखरियाल निशंक, डॉ. हर्षवर्धन, सदानंद गौडा, संतोषकुमार गंगवार, बाबुल सुप्रियो, संजय धोत्रे, रतनलाल कटारिया, प्रतापचंद सारंगी, देबोश्री चौधरी.

Modi Government MP Udayanraje Bhosale and MP Sambhajiraje Chhatrapati Are Not Included In The Union Cabinet Expansion 2021

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com