राज्यात आजही कोरोनाचा विस्फोट; तब्बल 'इतक्या' नव्या रुग्णांची पडली भर...

मिलिंद तांबे
Friday, 31 July 2020

आज दिवसभरात 7, 543 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आज 265 मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा 14,994 वर पोहोचला आहे. राज्यात आज रोजी एकूण 1,50,662 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.                        

मुंबई : दिवसेंदिवस राज्यातील कोरोना रुग्णांची सातत्याने वाढ होत आहे. अनलॉकचा तिसरा टप्पा सुरु होण्याच्या पूर्वसंध्येला सलग दोन दिवस कोरोना रुग्णसंख्या दहा हजारांच्या वर जात आहे. त्यामुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे. गुरुवारी राज्यात 11 हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाल्यानंतर आज पुन्हा एकदा दहा हजारांच्या वर रुग्णांची नोंद झाली आहे.

औषधी वनस्पतींकडे वाढता कल; अनेकांनी फुलवली घरच्या घरी आयुर्वेदिक बाग...

राज्यात आज तब्बल 10,320 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तर एकूण बाधित रुग्णांची एकूण संख्या 4,22,118 झाली आहे. असे असले तरी आज दिवसभरात 7, 543 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आज 265 मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा 14,994 वर पोहोचला आहे. राज्यात आज रोजी एकूण 1,50,662 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.                        

पश्चिम रेल्वेचा प्रवास आता अधिक वेगवान; खार ते वांद्रे दरम्यान पूर्ण झाले महत्वाचे काम...​

आज 7,543 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आतापर्यंत 2,56,158 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 60.68 % एवढे झाले आहे.आज राज्यात एकूण 265 मृत्यूंची नोंद झाली. त्यापैकी ठाणे परिमंडळ 128, पुणे मंडळ 79, नाशिक 11, औरंगाबाद मंडळ 7, कोल्हापूर 16, लातूर मंडळ 13,अकोला मंडळ 8, नागपूर 13 येथील मृत्यूचा समावेश आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.55 % एवढा आहे.   

मुंबई पुण्यातील लॉकडाऊन फसला का ? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडलं स्पष्ट मत...

पश्चिम रेल्वेचा प्रवास आता अ

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 21,30,098 नमुन्यांपैकी 4,22,118 ( 19.81 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 99,557 लोक होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 39,535 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

हृदयद्रावक ! एकाच वेळी पोलिस दलात सहभागी झालेल्या जुळ्या भावांवर कोरोनाने एकत्रच घातला घाला...

मुंबईत 1100 नवीन रुग्णांची भर
मुंबईत पुन्हा रुग्णसंख्या हजारच्यावर गेली असून आज 1,100 नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,14,287 झाली आहे. तर आज 53 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 6,350 वर पोचला आहे. मुंबईत आज एका दिवसात 1,689 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 76 टक्के इतका आहे.           
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: more than ten thousand covid positive patinets registered today in maharastra