नारायण राणे अडचणीत? महिला आयोगानं दिला 'हा' आदेश

दिशा सालियान प्रकरणाच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांना दिला आदेश
Narayan Rane
Narayan Ranesakal media

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतची (Sushant Singh Rajput) माजी व्यवस्थापक दिशा सालियान (Disha Saliyan) यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत भाष्य केलं होतं. यामुळं आता नारायण राणे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्याविरोधात याबाबत राज्य महिला आयोगाकडं (State Women's Commission)तक्रार नोंदवण्यात आली आहे. याची दखल घेत आयोगानं मालवणी पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. (Narayan Rane in trouble State Women Commission gives order in Disha Salian case)

राज्य महिला आयोगाकडं प्राप्त झालेल्या तक्रार अर्जाची माहिती देताना अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलं की, "मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास प्राप्त झाला आहे. दिशा सालियान सुशांतसिंग राजपूत यांच्या पूर्व व्यवस्थापक होत्या. तिच्या मृत्यूबाबत सीबीआय यंत्रणेमार्फत तपास करण्यात आला आहे. नारायण राणेंनी केलेल्या आरोपांप्रमाणं कुठलंही गोष्ट घडली नसल्याचं तिच्या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलं आहे"

Narayan Rane
दिल्ली हायकोर्टाने वैवाहिक बलात्कार याचिकांवरील निकाल ठेवला राखून

या शवविच्छेदन अहवालाला दिशाच्या आईवडिलांनी देखील दुजोरा दिला आहे, असं असतानाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशा सालियान हिच्यासंबंधी गंभीर दावा करताना तिची हत्या झाल्याचा आरोप केला होता. ही बाब अतिशय दुर्दैवी व वेदनादायक आहे. त्यामुळं मृत्यूनंतरही दिशा सालियान यांची बदनामी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आगोगाकडे केली आहे.

Narayan Rane
बिग बॉसमधल्या अभिनेत्रीनं धर्मासाठी सोडलं बॉलीवूड, हिजाबचं समर्थन

पेडणेकर यांच्या तक्रारीची दखल घेत राज्य महिला आयोगानं मालवणी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना ४८ तासांमध्ये याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com