राणा दाम्पत्यावर अटकेची टांगती तलवार? मुंबई पोलिसांनी केली ‘ही’ मागणी...

न्यायालयाने जामीन मंजूर करताना खटल्याशी संबंधित बाबींवर न बोलण्यास सांगितले होते
Navneet Rana, Ravi Rana News
Navneet Rana, Ravi Rana NewsNavneet Rana, Ravi Rana News

Navneet Rana, Ravi Rana News मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि पती आमदार रवी राणा हे दाम्पत्य हनुमान चालिसा पठणाच्या प्रकरणी पुन्हा एकदा अडचणीत येऊ शकते. राणा दाम्पत्य सध्या जामिनावर आहे. यासंदर्भात न्यायालय सोमवारी (ता. २२ ऑगस्ट) निकाल देणार आहे. त्यांच्यावर जामीन अटींचा भंग केल्याचा आरोप आहे. या आरोपांवरून मुंबई पोलिसांनी अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे.

न्यायालयाने जामिनाबाबत दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याचा आरोप राणा दाम्पत्यावर आहे. कोर्टाने राणा दाम्पत्याला (Navneet Rana) सांगितले होते की, ते त्यांच्या प्रकरणाबाबत मीडियाशी बोलणार नाही. मात्र, राणा दाम्पत्य न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करीत असल्याचे समोर आले आहे. न्यायालयाने गुरुवारी राणा दाम्पत्याचा युक्तिवाद ऐकून घेतला.

Navneet Rana, Ravi Rana News
Suicide attack : काबूलमध्ये आत्मघाती हल्ला; तालिबानचा रहीमुल्लाह हक्कानी ठार

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा म्हणण्याची घोषणा राणा दाम्पत्याने केली होती. यानंतर मुंबई पोलिसांनी देशद्रोहासह अनेक आरोपांखाली राणा दाम्पत्यावर (Ravi Rana) गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर २३ एप्रिल रोजी त्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर ४ मे रोजी जामीन मंजूर करण्यात आला होता. न्यायालयाने जामीन मंजूर करताना खटल्याशी संबंधित बाबींवर न बोलण्यास सांगितले होते.

न्यायालयाचा अवमान केला

अटींचे उल्लंघन झाल्यास जामीन रद्द करण्यात येईल, असेही न्यायालयाच्या (Court) आदेशात म्हटले होते. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयाला सांगितले की, सुटकेनंतर राणा दाम्पत्याने मीडियाला अनेक मुलाखती दिल्या आणि प्रकरणावर भाष्य केले. यामुळे त्यांचा जामीन रद्द करावा. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया या खटल्याच्या विषयावर होत्या. त्यांनी न्यायालयाचा अवमान केल्याचेही प्रदीप घरत म्हणाले.

Navneet Rana, Ravi Rana News
Aakash Chopra : आकाशवरच युजर्सनी टाकला बहिष्कार; लाल सिंग चड्ढाबद्दल म्हणाला...

मुलाखतीचे निवडक भाग घेतले

राणा दाम्पत्याचे वकील रिझवान मर्चंट यांनी या प्रतिक्रिया खटल्याशी संबंधित नसल्याचे सांगितले आहे. मुलाखतीचे निवडक भाग घेतले आहे. न्यायालयाने मुलाखतींचा संपूर्ण विचार करावा, असे रिझवान मर्चंट म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com