Latur RCC Coaching Owner Arrested
esakal
viral post on Latur education system transformation : NEET पेपर लीक प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्रातून समोर आले आहेत. या प्रकरणी लातूरमधील आरसीसी क्लासेसचे संचालक मोटेगावकर (Latur RCC coaching arrest latest news ) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी नीट परीक्षेतील काही प्रश्न लीक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच मोटेगावकर यांच्याशी संबंधित एक सोशल मीडिया पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.