बापरे! राज्यात एकाच दिवसात पोलिसांची 'इतक्या' लाखांची दंडात्मक कारवाई; कारवाईत आणखी वाढ होणार..

traffic police
traffic police

मुंबई: पोलिसांकडून वारंवार आवाहन करण्यात आल्यानंतरही काम नसतानाही बाहेर पडणा-यांची संख्या कमी होत नसल्यामुळे राज्यभरात पोलिसांनी कारवाया आणखी कडक केल्या आहेत. त्या अंतर्गत शुक्रवारी एकाच दिवसात 53 लाखांची दंडात्मक कारवाई राज्यभरात करण्यात आली. शनिवार, रविवारी सुटीचा कालावधी असल्यामुळे दोन दिवसात या कारवाईत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यात 2 जुलैपर्यंत 10 कोटी 32 लाख 34 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. एकाच दिवसात 53 लाखांचा दंड वसूल करण्यात आल्यामुळे 10 कोटी 85 लाख रुपयांचावर पोहोचला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्यभरात कलम 144 अंतर्गत विविध नियम लागू करण्यात आले आहेत. 

त्यात नियम मोडणा-यांवर दोनशे ते दोन रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येतो. त्यात दुचाकीवर दोघांनी प्रवास करणे, चार चाकी वाहनांमध्ये तीन पेक्षा अधिक व्यक्तींनी प्रवास करणे, कोणते काम नसताना फिरणा-यांवर करण्यात आलेल्या कारवाईची संख्या अधिक आहे.

मोटर वाहन कायदा कलम 179 अंतर्गत चालकावर ही कारवाई करण्यात येते. तसेच कलम 207 अतर्गत गाडी जप्त करण्यात येते. जप्त केलेली गाडी स्वीकारताना ईचालानद्वारे जारी झालेला दंड वसूल करण्यात येतो. राज्य भराचा विचार केला, तर 2 जुलैला 11 लाख, 1 जुलैला 26 लाखांचा दंड वसूल करण्यात आला होता.

दंडात्मक कारवाईसह भादंवि कलम 188, 269, 270, 271, साथीचे आजार कायदा, आपत्ती व्यवस्थापक कायद्या अंतर्गतही गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्यात नियम तोडणा-या व्यक्तींला अटक करून जामिनावर सुटका करण्यात येते. असे एक लाख 45 हजार 896 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबई, ठाणे व नवी मुंबईतही मोठ्याप्रमाणात या कारवाया करण्यात आल्या आहेत.

मुंबईत लॉकडाऊनमध्ये 'इतक्या' जणांवर गुन्हे:

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊनचा सहावा टप्पा सुरु असुन, मुंबईतील लॉकडाउन सुरू झाल्यापासून लागू झालेली संचारबदी आणि जमावबंदीच्या कारवाईची तीव्रता पोलिसांनी वाढविली आहे. त्यानुसार, मुंबईत लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत  नियमभंग करणा-या 25 हजार 518 व्यक्तींविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले असून अटक करून जामिनावर सोडलेल्यांची संख्याही 15 हजार 78 पर्यंत पोहोचली.

मुंबईत रविवारपासून कारवाई तीव्र करण्यात आली होती. रविवारी 2061, सोमवारी 1997 व मंगळवारी 900 व्यक्तींवर कलम 188 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. तीन दिवसांत एकूण 4958 गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या अंतर्गत रविवारी 1046, सोमवारी 921 व मंगळवारी 417 व्यक्तींना अटक करण्यात आली. रविवारी एका दिवासतात 2061 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात ही एका दिवसातील सर्वाधीक कारवाई आहे

police did Punitive action in state read full story

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com