फडणवीस स्वत:साठी वक्तव्य करतात; त्यामुळे राज्यपालांना भूमिका पार पाडावी लागते - आंबेडकर

नितेश राणे यांच्यानंतर आता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थ केलंय
Prakash Ambedkar latest news
Prakash Ambedkar latest newssakal
Summary

नितेश राणे यांच्यानंतर आता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थ केलंय

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुबंईसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यपालांच्या या वक्तव्याचा विरोधाकांकडून निषेध केला जात आहे. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांच्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थ केलं आहे. राज्यपालांचं वक्तव्य चुकीचं नाही, मी त्यांच्या समर्थन करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. (prakash ambedkar support to governor koshyari statement)

यावेळी ते म्हणाले, राज्यपालांच्या वक्तव्याने महाराष्ट्राचा अपमान झालेला नाही. राज्यात दोघेजण वक्तव्य करतात. एक देवेंद्र फडणवीस आणि दुसरे राज्यापाल कोश्यारी. यातील फडणवीस यांची अनेक वक्तव्यही स्वत:साठी असतात, त्यामुळे भाजप पक्षासाठी कुणीही वक्तव्य करत नाही, असं चित्र महाराष्ट्रात आहे. त्यामुळे ती भूमिका राज्यपाल पार पाडत असावेत, असं म्हणत त्यांनी राज्यपालांचे समर्थन करत फडणवीसांचे कान टोचले आहेत.

Prakash Ambedkar latest news
राज्यपालांचं समर्थन करणाऱ्या नितेश राणेंवर पेडणेकरांची टीका; म्हणाल्या, जेव्हा तू गोधडीत होतास...

विरोधकांकडून होणाऱ्या प्रतिक्रिया संदर्भात विचारले असता आंबेडकर म्हणाले, राज्यापालांची उचलबांगडी कशासाठी? त्यांनी हे वक्तव्य करुन मराठी माणसाला इशारा दिला आहे. येथील व्यापार हा राजस्थानी आणि गुजराती लोकांच्या हाती आहे. त्याचा फायदा राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला झाला आहे. कारण इतकी वर्ष राज्य आणि सत्ता असूनही त्यांनी मराठी माणसाच्या हाती आर्थिक व्यवहार न देता ते राजस्थानी आणि गुजराती लोकांकडे दिले. त्यामुळे राज्यपालांनी याची जाणीव करुन दिली आहे. त्यामुळे मराठ्यांनी आता ठरवले पाहीजे की, या भुजगावण्यांसोबत रहायचे की नवीन नेतृत्व तयार करायचं, असंही त्यांनी सूचवलं आहे.

राज्यपाल कोश्यारींचा हा टोला राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षातील मराठी नेत्यांना आहे. तुम्ही इतकी वर्ष राज्य करुनही मराठी लोकांच्या हाती व्यवहार येऊ दिलेले नाहीत. आजही हे व्यापार गुजराती आणि राजस्थानी लोकांच्या हाती आहे. या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचा कोणताही अपमान झालेला नाही. कारण राज्यपाल कोश्यारींनी सत्य परिस्थिती मांडली आहे, असंही प्रकाश आंबडेकरांनी स्पष्ट केलं आहे.

Prakash Ambedkar latest news
खोतकरांचा शिंदे गटाला पाठींबा जाहीर; उद्धव ठाकरेंची साथ सोडताना अश्रू अनावर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com