'MPSC'मधून निवड झाली, पण सध्या शेतमजूर म्हणून काम करतोय; नियुक्तीचे काय? तरुणाचा सरकारला सवाल

pravin kotkar asked question to government for mpsc joining nagpur news
pravin kotkar asked question to government for mpsc joining nagpur news

नागपूर : एमपीएससीने गुरुवारी परीक्षा पुढे ढकलण्याबाबत परीपत्रक काढले होते. त्यानंतर विद्यार्थी चांगले संतप्त झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठ दिवसात परीक्षा घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आज एमएपीएससी परीक्षेची नवी तारीख जाहीर झाली आहे. मात्र, काल विद्यार्थ्यांनी केलेल्या चक्काजाम आंदोलनाच्या तापलेल्या वातावरणात एक तरुणाने नियुक्तीबाबत प्रश्न उपस्थित करत ट्विट केले आहे. त्याने ट्विटमधून थेट सरकारला जाब विचारला आहे.

प्रवीण कोटकर, असं ट्विट करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. त्याने ट्विटमध्ये म्हटलंय, की 'MPSC मधून माझी ना. तहसीलदार म्हणून निवड झाली. 10 महिने झाले तरी सरकारने नियुक्ती दिली नाही. सध्या शेतमजूर म्हणून काम करतोय. लोक आम्हाला हसतात आणि सरकरला शिव्या देतात. नियुक्ती कधी ?' असा प्रश्न उपस्थित केला. 

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन घोषित केले जात आहे. त्यामुळे या काळात परीक्षा घेणे योग्य होणार नाही, अशी सूचना पुनर्वसन विभागाने एमपीएससीला केली होती. त्यानंतर एमपीएससीने निर्णय घेत १४ मार्चला होणारी परीक्षा पुढे ढकलत असल्याचे परीपत्रक काढून जाहीर केले. परीक्षा वारंवार पुढे ढकलत असल्यामुळे विद्यार्थी चांगलेच संतप्त झाले होते. पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले. सरकारविरोधात घोषणाबाजी करून परीक्षा वेळेत घेण्याची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठ दिवसांत परीक्षा घेण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार आज एमपीएससीची नवी तारीख जाहीर झाली असून परीक्षा २१ मार्चला घेण्यात येणार आहे.   


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com