Anil Parab
Anil Parabe sakal

Anil Parab: अभियंता मारहाण प्रकरणी अनिल परब यांना अटकपूर्व जामीन मंजूर!

Anil Parab: मुंबई महापालिका अभियंत्याला मारहाण प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा दिली आहे. अनिल परब यांच्यासह इतर सहा जणांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

प्रत्येकी 15000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी अनिल परब यांच्या सोबत इतर 6 जणांना केला अटकपूर्व जामीन मंजूर केला.

यापूर्वी  शिवसेना आमदार अनिल परब यांच्यासह सहा जणांना विशेष सत्र न्यायालयाने आज मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणात ६ जुलैपर्यंत संरक्षण दिले होते. आज त्यांच्या संरक्षणाची मुदत संपली होती.

Anil Parab
Amol Mitkari: पवारसाहेब जितेंद्र आव्हाडांची खासगी मालमत्ता नाही, अमोल मिटकरींनी सुनावलं

वांद्रे येथील शिवसेना शाखेवर कारवाई केल्याचा जाब परब यांनी के एच प्रभाग कार्यालयातील संबंधित अभियंता-कर्मचाऱ्याला केला. त्यानंतर त्याला धक्काबुक्की केली, असा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. अटक होण्याच्या शक्यतेने सर्वांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.


पोलिसांच्या तक्रारीनुसार वांद्र्यामधील प्रशासकीय कामांसाठी परब आणि काही कार्यकर्ते के एच प्रभाग कार्यालयात गेले होते. त्यावेळी वांद्रे येथील शिवसेनेच्या शाखेवरील कारवाईचा विषय निघाला. ही कारवाई कोणी केली, असा सवाल परब यांनी केला आणि संबंधित अधिकाऱ्याला बोलवायला सांगितले. त्यानंतर काही अधिकारी आले तेव्हा त्यातील संबंधित अधिकाऱ्याशी बाचाबाची झाली.

Anil Parab
Ajit Agarkar: अखेर शिक्कामोर्तब! घसघशीत पगारवाढीसह आगरकरची निवड समितीच्या चेअरमनपदी नियुक्ती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com