शेतकऱ्यावर अवकाळीचे संकट कायम | rain alert in maharshtra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rain
शेतकऱ्यावर अवकाळीचे संकट कायम

शेतकऱ्यावर अवकाळीचे संकट कायम

अकोला : अकोला, वाशीम, बुलडाण्यासह राज्यभरात अवकाळी पावसाचे(heavy rain) सावट दाट झाले असून, पुढील तीन ते चार दिवस ही शक्यता कायम राहण्याचे संकेत हवामान अभ्यासकांनी दिले आहेत.कधी गारवा, कधी दमट-उष्ण तर, कधी गारपीटीसह(hail strom) पाऊस अशी स्थिती यावर्षीच्या हिवाळ्यात पाहायला मिळात आहे. जानेवाराच्या सुरुवातीलाच थंडीची लाट असताना अवकाळी पावसाने गारपीटीसह हजेरी लावली व मोठ्या प्रमाणात पीक नुकसान(damage crops) केले. शिवाय वातावरणातील बदलामुळे आजारांच्या प्रमाणातही वाढ झाली. आताही राज्यात अवकाळी पावसाचे सावट असून, पुढील तीन ते चार दिवस स्थिती कायम राहण्याच हवामान अंदाज आहे.(rain alert in maharashtra)

हेही वाचा: Corona Update Akola : सलग दुसऱ्या दिवशी १९६ कोरोनाचे पॉझिटिव्ह!

तूर उत्पादक चिंतेत

कधी नव्हे तो आता बाजार समितीमध्ये तुरीला हमीभावापेक्षाही अधिक दर मिळाला. सध्याही बाजार समितीमध्ये प्रतिक्विंटल सहा ते सात हजार रुपये दर मिळत आहे. शिवाय यावर्षी तुरीचे भरघोस उत्पादन मिळेल अशी पीक स्थिती असून, बहुतांश भागात तूर सोंगणीवर तर, काही शेतकऱ्यांनी तूर सोंगून शेतात ठेवली आहे. परंतु, हवामान अंदाजानुसार अवकाळी पाऊस, गारपीटीने हजेरी लावल्यास तूर उत्पादकांचे मोठे नुकसान होऊ शकते.

आंबे बहाराला बसू शकतो फटका

कागदी लिंबाच्या झाडाला जानेवारी-फेब्रुवारीत (आंबे बहार) चांगला फुलोर, पालवी धरते. मात्र, याच कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीटीची शक्यता असल्याने लिंबाच्या आंबे बहाराला मोठा फटका बसू शकतो.

या भागात अवकाळीचे सावट

वाशीम, बुलडाणा जिल्हा, अकोला-बुलडाणा जिल्हा सीमा म्हणजे बाळापूर, मेहकर परिसर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसोबत औरंगाबाद, जालना, नाशिक, बीड, परभणी या जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे.

हेही वाचा: अकोला : पॉझिटिव्ह रुग्ण संख्येची गती वाढली!

नियमित वेळेच्या आधी कोकण(kokan rain update ) सह, पुणे, नाशिक, मराठवाडा, खान्देश, विशेषतः पश्चिम विदर्भात(vidarbha) अवकाळी पावसाचे ढग जमलेले उपग्रह छायाचित्रात दिसून येत आहे. मुंबई-पुणे परिसरात, गुजरात ते कर्नाटक पर्यंत विस्तारलेली ट्रफ सदृश परिस्थिती पुणे, कोकण विभागात ढगाळलेले वातावरण(bad weather) घेऊन आले आहे. राज्यावर सक्रिय मध्यवर्ती वातावरण अवकाळीकरिता पूरक परिस्थिती ठरत आहे, अशी परिस्थिती पुढील ३-४ दिवस कायम राहण्याची शक्यता.

- संजय अप्तुरकर, हवामान अभ्यासक, नागपूर

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top