Raj Thackeray Speech : मला असे मुस्लीम हवे आहेत; राज ठाकरेंनी थेट व्हिडीओ दाखवूनच सांगितलं! | Raj Thackeray speech MNS Showed Video of Javed Akhtar in Pakistan Maharashtra Politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray
Raj Thackeray Speech : मला असे मुस्लीम हवे आहेत; राज ठाकरेंनी थेट व्हिडीओ दाखवूनच सांगितलं!

Raj Thackeray Speech : मला असे मुस्लीम हवे आहेत; राज ठाकरेंनी थेट व्हिडीओ दाखवूनच सांगितलं!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये आपली मुस्लिम आणि भोंग्यांबद्दलची भूमिका स्पष्ट केली आहे. तसंच त्यांनी आपल्या सभेमध्ये एक व्हिडीओ दाखवला आहे. तसंच त्यांनी जावेद अख्तर यांचं कौतुकही केलं आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणादरम्यान बोलताना जावेद अख्तरांचा एक व्हिडीओ दाखवला आहे. या व्हिडीओमध्ये जावेद अख्तर यांनी पाकिस्तानवर आणि तिथल्या दहशतवादी कारवायांवर टीका केली आहे. हा व्हिडीओ दाखवून बोलताना राज ठाकरेंनी आपल्याला असे मुस्लिम हवे आहेत, असं म्हटलं आहे.

राज ठाकरे म्हणाले, "मला जावेद अख्तरांसारखे मुस्लिम हवे आहेत. त्यांनी पाकिस्तानात जाऊन सांगितलं. आमच्या शहरावर हल्ला झालेला आम्ही विसरणार नाही. तिथे जाऊन त्यांनी सांगितलं. मला असेल मुस्लिम लोक हवे आहेत."

राज ठाकरे यांनी आपली मशिदींवरच्या भोंग्याची भूमिकाही आजच्या सभेत स्पष्ट केली आहे. तसंच मनसैनिकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून म्हणाले, "आज मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगू इच्छितो. आता तुम्हाला शिवसेना नाव मिळालं, चिन्ह मिळालं. मागच्या वर्षी भोंग्याचं आंदोलन झालं, त्यावेळी १७ हजार मनसैनिकांवर गुन्हे दाखल झालेत. ते सगळे गुन्हे मागे घ्या.

राज ठाकरे पुढे म्हणाले,"मशिदींवरचे भोंगे पुन्हा एकदा वाजू लागले आहेत. एकतर तुम्ही बंद करा. नाहीतर मग आम्ही जे काय करतो, त्याकडे दुर्लक्ष करा. आमच्या पद्धतीने आम्ही हे भोंगे बंद करतो."