Ravi Rana
Ravi RanaRavi Rana

मुख्यमंत्री आमदार व खासदारांना फसवण्याचा मागे लागले - रवी राणा

अमरावतीतील शाही फेक प्रकरणात मला फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर पोलिसांवर दबाव टाकून फसवण्याचा प्रयत्न करीत आहे. राजकीय सुडबुद्धीने मला फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्य सरकार, मुख्यमंत्री आमदार व खासदारांना फसवण्याचा मागे लागले आहे, असे आमदार रवी राणा (Ravi Rana) पत्रकार परिषदेत म्हणाले.

अमरावतीतील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्याने मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेक करण्यात आली होती. राजापेठ उड्डाणपुलावरील पुतळा हटवल्याने शिवप्रेमी चांगलेच आक्रमक झाले होते. याप्रकरणी रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमरावतीच्या खासदार नवनीत या मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गेल्या होत्या. मात्र, प्रकृतीचे कारण देत आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी नवनीत राणा यांची भेट नाकारली होती, हे विशेष...

Ravi Rana
भीषण अपघातात अख्ख कुटुंब ठार; कारचा टायर फुटल्याने घडला अनर्थ

मी घटनास्थळी नसतानाही माझ्यावर गुन्हा दाखल केल्याचे खासदार नवनीत राणा म्हणाल्या होत्या. अमरावतीत पोहोचल्यानंतर याबद्दल बोलणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. नवनीत राणा अमरावतीत पोहोचल्यानंतर त्यांना हुकुमशाहीसारखी वागणून देण्यात आली. त्यांना एक तास बसवून ठेवले होते. पोलिसांना त्यांना धक्कबुक्की केली. एका खासदाराला आरोपीसारखी बागणूक दिली, असेही रवी राणा (Ravi Rana) म्हणाले.

राज्य सरकार, मुख्यमंत्री उद्वव ठाकरे आमदार आणि खासदारांना फसवण्याचा मागे लागले आहे. गृहमंंत्री दिलीप वळसे (dilip walse patil) पाटील फोन करून रवी राणा यांना अटकवा असे सांगतात. हे चुकीचे आहे. माल चुकीच्या पद्धतीने फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे केले तर गृहमंत्र्यांचेही अनिल देशमुख व्हायला वेळ लागणार नाही, असेही रवी राणा म्हणाले. मला चुकीच्या पद्धतीने फसवाल तर कुणी वाझे तयार होईल आणि तुम्हालाही फसवेल. माझ्यावर गुन्हे दाखल कराल तर तुम्हालाही त्रास होईल, असेही रवी राणा (Ravi rana) म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com