चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढणार? कुचिक बलात्कार प्रकरणी महिला आयोग करणार कारवाई|Rupali Chakankar on Kuchik Case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rupali Chakankar on Kuchik Case

कुचिक बलात्कार प्रकरण : वाघ यांच्या अडचणी वाढणार? महिला आयोग करणार कारवाई

पुणे : शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीने भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला बळजबरीने पोलिसांना जबाब देण्यास चित्रा वाघ यांनी भाग पाडले, असा दावा या तरुणीने केला आहे. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी याप्रकरणात कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा: कुचिक बलात्कार प्रकरण; चित्रा वाघ यांच्यावर तरुणीचे गंभीर आरोप

काय म्हणाल्या रुपाली चाकणकर? -

महाराष्ट्राच्या समाजकारणात, राजकारणात जे घडतंय ते अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारला बदनाम करण्यासाठी असे षडयंत्र रचले जातात. यंत्रणेचा असा गैरवापर करणाऱ्यांवर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. भाजपकडून दररोज सकाळी एक स्क्रीप्ट तयार केली जाते. त्यानुसार दिवसभर ती स्क्रीप्ट वाचून नाट्य केलं जातं. महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी हे सर्व केलं जातंय. आज मी पीडितेची भेट घेणार आहे. तिने सविस्तर माहिती दिल्यानंतर मी कारवाई करणार आहे, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. त्या साम टीव्हीसोबत बोलत होत्या.

पीडितेचे आरोप नेमके काय? -

गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे आरोप केले होते. त्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रकरण लावून धरलं होतं. पण, आता तरुणीने वाघ यांच्यावर गंभीर आरोप करत गौप्यस्फोट केला आहे. वाघ यांनी माझ्यावर दबाव टाकत आरोप करण्यास सांगितले आणि माझ्या मोबाईलमधून एका अॅपच्या सहाय्याने मेसेज पाठविण्यात आले. वाघ यांनी गोव्यात मला डांबून ठेवलं होतं, असंही तरुणीने म्हटलं आहे. याबाबत साम टीव्हीने वृत्त दिलं आहे.

Web Title: Rupali Chakankar Woman Commission Action Against Chitra Wagh In Shivsena Leader Kuchik Rape Allegations Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top