सचिन सावंतांचे लाव रे तो व्हिडिओ; शेलारांना दिले जशास तसे उत्तर

दाऊदच्या नावाने बोंब ठोकणाऱ्या भाजपावाल्यांनो तुमने उनका नमक खाया है - सावंत
political
politicalesakal

आज राज्याच्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. मात्र पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक पहायला मिळाली. दोन्ही गटातील राजकीय नेते एकाचवेळी आक्रमक होताना दिसले. दरम्यान, यासंदर्भात राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रियाही आल्या. यावरून एकमेकांवरील आरोपप्रत्यारोपही पहायला मिळाले. आता पुन्हा एकदा कॉंग्रसचे सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी एक खळबळजनक ट्विट केलं आहे.

political
'मलिकांनी हसीना पारकरला ५५ लाख दिले नाही, ही तर...', ED चं कोर्टात स्पष्टीकरण

या ट्विटमध्ये सावंत यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. यात त्यांनी एका वृत्तवाहिनीचा व्हिडिओ शेअर केला असून भाजपाचे आशिष शेलार (Aashish Shelar) यांच्यावर निशाणा साधला आहे. यात त्यांनी भाजपाच्या गिरीश महाजन यांच्याही नावाचा उल्लेख केला आहे. ते म्हणतात, दाऊदच्या नातेवाईकांची दावत खाऊन आता दाऊदच्या नावाने बोंब ठोकणाऱ्या भाजपावाल्यांनो तुमने उनका नमक खाया है, शंका असेल तर गिरीश महाजनांना (Girish Mahajan0 विचारा, असा टोमणा त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अनेक नाट्यम घडामोडी घडल्या. राज्यपालांच्या अभिभाषणावेळीच मोठा गोंधळ झालेला पहायला मिळाला. या गोंधळामुळे राज्यपालांनी (Bhagat singh koshyari) आपलं भाषण अर्ध्यावरच थांबवलं आणि ते निघून गेले. राज्यपालांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याबरोबर सत्ताधाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या नावाची घोषणाबाजी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजनेही मग नवाब मलिक (Nawab Malik) हाय हाय च्या घोषणा दिल्या. यामुळे काही काळा विधानभवन परिसरात तणाव निर्माण झाला होता. आता सावंत यांच्या या ट्विटमुळे पुन्हा एकदा नव्या काही चर्चांना उधाण आलं आहे.

political
कोण कोणाच्या मांडीवर बसलयं हे कळतं नाही; भुजबळ झाले हतबल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com