सकाळ-चित्रकला स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

Drawing-Competition-2020
Drawing-Competition-2020

शालेय मुलांबरोबरच महाविद्यालयीन, दिव्यांग विद्यार्थी आणि पालकांची नोंदणी
पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा ऑनलाइन सुरू आहेत. त्यामुळे ‘सकाळ माध्यम समूहाद्वारे’ घेण्यात येणारी ‘सकाळ-चित्रकला स्पर्धा २०२०’ ही देखील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ऑनलाइन घेण्यात येत आहे. यावर्षी ही स्पर्धा शालेय, महाविद्यालयीन, दिव्यांग विद्यार्थी आणि पालक व आजी-आजोबांसाठी खुली आहे. राज्यभरातून या स्पर्धेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या स्पर्धेत सहभागासाठी वयाचे कोणतेही बंधन नाही. ही स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक, उच्च-माध्यमिक व विविध विद्या शाखांच्या महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी तसेच पालकांसाठी व आजी-आजोबांसाठी खुली असेल. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्पर्धेचे स्वरूप व ऑनलाइन स्पर्धेचे नियम
1) ही स्पर्धा एकूण चार गटात घेण्यात आहे. 
अ - गट (पहिली ते चौथी) 
ब - गट (पाचवी ते सातवी) 
क - गट (आठवी ते बारावी) 
आणि ड - गट 
(बारावी नंतरचे सर्व व पालक, आजी-आजोबा)

2) सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी व आजी-आजोबांनी ‘सकाळ-चित्रकला २०२०’ स्पर्धेत भाग घेण्यासाठी https://chitrakala.esakal.com/index.php या वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करणे आवश्‍यक आहे.

3) गटाप्रमाणे स्पर्धेच्या विषयांची माहिती वेबसाइटवर मिळेल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर ए३ आकाराच्या चित्रकलेच्या कागदावर चित्र काढून व चित्र पूर्ण रंगवून, चित्राच्यावरील बाजूस (उजवीकडे ) आपले पूर्ण नाव, गट, इयत्ता, पत्ता (तालुका, जिल्हा) व मोबाईल नंबर इत्यादी माहिती लिहिणे आवश्‍यक आहे. तसेच पालक आजी-आजोबा असतील तर त्यांनी वयाचा उल्लेख करणे आवश्‍यक आहे.

4) चित्र काढून झाल्यानंतर चित्राचा फोटो काढून किंवा चित्र स्कॅन करून (४ एमबी साइझपर्यंत) वरील वेबसाइटवर अपलोड करावे. स्पर्धेचा कालावधी १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२१ पर्यंत राहील.

स्पर्धेविषयी व ऑनलाइन नोंदणी, ऑनलाइन चित्र अपलोड करणे इत्यादी बाबींविषयी काही अडचण असल्यास खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा : ९९२२४१९१५०/८६०५०१७३६६ 

गरजू, दिव्यांग विद्यार्थ्यांना संधी
राज्यभरातील प्रमुख शहरातील आश्रम शाळांमधील गरजू व विशेष आणि दिव्यांग विद्यार्थी यांच्यासाठी स्पर्धा ऑनलाइन न घेता, त्यांना स्पर्धेसाठी लागणारे साहित्य कागद, रंगसाहित्य व प्रश्‍नपत्रिका प्रमुख शहरांमधील (पुणे, पिंपरी-चिंचवड, सातारा, कोल्हापूर, नगर, औरंगाबाद, मुंबई, नाशिक, नागपूर व गोवा) दैनिक ‘सकाळ’च्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येईल. स्पर्धेचे विषय व वयोगट सारखेच राहतील. प्रमुख शहरातील आश्रम शाळांमधील गरजू विद्यार्थी व विशेष आणि दिव्यांग विद्यार्थी व विशेष शाळांनी स्पर्धेसाठी खालील व्हाट्‌सअप नंबरवर नोंदणी करावी. ९९२२४१९१५० /
९९२२९१३४७३ / ८६०५०१७३६६

आर्थिक मदतीचे आवाहन
पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन एका गरजू किंवा दिव्यांग विद्यार्थ्याला ‘सकाळ-चित्रकला स्पर्धा २०२०’मध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्या. या उपक्रमासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, खासगी कंपनी, आस्थापना व सीएसआर कंपन्या यांना ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या वतीने आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ संस्थेला दिलेली आर्थिक मदत ही प्राप्तिकर कायद्याच्या ८०-जी कलमानुसार सवलतीस पात्र आहे.

पालकांना, आजी-आजोबांना सुवर्णसंधी
‘सकाळ’ चित्रकला स्पर्धेचे हे ३५वे वर्ष साजरे करत आहे. 
तीन पिढ्यांना जोडलेली ही एकमेव स्पर्धा आहे. या स्पर्धेत १९८५ पासून भाग घेतलेल्या पण आता पालक किंवा आजी-आजोबा झालेल्यांसाठीही यंदाची ‘सकाळ-चित्रकला स्पर्धा’ सुवर्णसंधी आहे. या ऑनलाइन स्पर्धेत पालक व आजी-आजोबांना देखील सहभागी होऊ शकतात. 
यानिमित्ताने पालकांना व आजी-आजोबांना स्वतः भाग घेतलेल्या ‘सकाळ-चित्रकला’ स्पर्धेचे त्यांचे अनुभव chitrakala@esakal.com या ईमेल आयडीवर 
पाठवता येतील. निवडक अनुभवांना वेबसाइटवर प्रसिद्धी देण्यात येईल. तसेच पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन एका गरजू किंवा दिव्यांग विद्यार्थ्याला ‘सकाळ-चित्रकला स्पर्धा २०२०’ मध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकता.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com